येणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यामध्ये तिरंगी लढत दिसून येत आहे. भाजपाचे मुरलीधर मोहोळ, ‘मविआ’चे रविंद्र धंगेकर आणि ‘वंचित’चे वसंत मोरे अशी ही लढत होणार आहे. दरम्यान आज (१६ एप्रिल) तीनही उमेदवारांनी पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पुण्याच्या विकासकामांवरून धंगेकर-मोहोळांमधील वातावरण तापलेलं दिसून आलं.