पुणे : मूळचे पहिलवान असलेले आणि आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. पहिलवानाला थेट लोकसभा निवडणुकीची संधी मिळाल्याने त्याच्या प्रचाराचे काम करण्याचा निर्धार पुणे आणि परिसरातील मल्लांनी केला. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ४५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी कर्वे रस्ता येथील अंबर हॅाल येथे पहिलवानांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते. माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेवक आप्पा रेणुसे, जिल्हा परिषदेचे सदस्य शुक्राचार्य वांजळे यांच्यासह पहिलवान बाबा कंधारे, हनुमंत गावडे, योगेश दोडके, संदीप भोंडवे, विलास कथुरे, ज्ञानेश्वर मांगडे, विजय बनकर, शिवराज राक्षे, राजेश बारगुजे, संतोष गरुड, नितीन दांगट, रामभाऊ सासवडे, पंकज हरपुडे, महेश मोहोळ, राजू मोहोळ, तात्या भिंताडे, अभिजित आंधळकर, विजय जाधव, अमोल बराटे, शिवाजी तांगडे आदी पहिलवान उपस्थित होते.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

आमच्यातील पहिलवानाला संधी मिळणे ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे मोहोळ यांच्यासाठी आपणही योगदान द्यावे, अशी प्रत्येक पहिलवानाची भावना आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन असून हजारो पहिलवान सहभागी होत आहेत, असे महाराष्ट्र केसरी विकी बनकर यांनी सांगितले. मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही आम्हा सर्व पहिलवानांचा सन्मान आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे हिंद केसरी पहिलवान योगेश दोडके म्हणाले.

हेही वाचा – “त्यांच्याकडे पैलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाल मातीशी नाते असणारा माझा परिवार एकवटला असून सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रचारासाठी सज्ज होत आहेत. येत्या कालावधीत ८ ते ९ हजार पहिलवान स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत. माझा पहिलवान परिवार या निमित्ताने एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब असल्याची भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.