लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात, महाराष्ट्रात आणि देश पातळीवर इंडिया आघाडीची मोर्चेबांधणी चालू आहे. तर महायुतीनेही प्रत्येक मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. महायुतीची पुणे मतदारसंघात जोरदार तयारी चालू आहे. गेल्या १० वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश बापट हे या मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी बापट यांचं निधन झालं. त्यानंतर हा मतदारसंघ रिक्त आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपातील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक नेते प्रयत्न करत आहेत. भाजपाचे माजी खासदार संजय काकडे हेदेखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, काकडे यांनी पुणे भाजपाच्या गोटात काय चाललंय याबाबतची माहिती दिली आहे. संजय काकडे म्हणाले, संपूर्ण भारतात इंडिया आघाडी लोकसभेची तयारी करत असली तरी त्यांच्या या तयारीचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची देशात जी प्रतिमा तयार झाली आहे, ती पाहता आणि तरुण वर्गाला मोदींचं जे आकर्षण आहे ते पाहता आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचा सुपडा साफ होईल. आपल्या देशातील तरुणांना विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी करून दाखवतील. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीच्या असण्याने भाजपाला काहीच फरक पडणार नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

संजय काकडे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुणे लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास, या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही पाच ते सहाजण इच्छूक आहोत. मी स्वतः पुणे लोकसभेसाठी इच्छूक आहे. माझ्यासह जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ आणि सुनील देवधर पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. आमच्या चौघांसह पडद्यामागे काम करणारे अनेकजण निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. ते सर्वच जण आपापल्या परीने पक्षाचंच काम करत आहेत. माझं धोरण असं आहे की अनेकांनी इच्छूक व्हावं. हे सर्व इच्छूक उमेदवार पक्षाचं काम करतात त्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण होतं.

हे ही वाचा >> “त्या हल्ल्याला राजकीय झालर”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य; रोख कोणाकडे?

संजय काकडे म्हणाले, ज्याला कोणाला निवडणुकीचं तिकीट मिळतं ते त्याच्या कामी येते. मी इच्छूक उमेदवार म्हणून माझ्या परीने काम करत आहे. मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर हेदेखील त्यांचं काम करत आहेत. यांच्यासह काही नेते पडद्यामागे आहेत त्यांचंही मतदारसंघात मोठं जाळं आहे. ते सर्वजण काम करत आहेत. ते पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात पक्षाचं कार्य करत आहेत, पुढेही करतील. पक्षकार्यासाठी अनेकजण इच्छूक असणं हे पक्षासाठी खूप फायद्याचं असतं.

Story img Loader