नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा.
माढा लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आयोजित जाहीर सभेत पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तिखट शब्दात हल्लाबोल केला.
सोलापूर आणि माढ्याच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आता बड्या नेत्यांच्याही सभा होत असल्यामुळे रणधुमाळी चांगलीच वाढली आहे.
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यानंतर संबंधित प्रचारकाला जबाबदार न धरता त्याच्या पक्षाला जबाबदार धरण्याचा हा पवित्रा भारतीय निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच आजमावला जातो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली.