scorecardresearch

About Videos

सई ताम्हणकर Videos

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
मराठी कथा ×