सई ताम्हणकरने गेल्या काही वर्षांत मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भक्षक’ चित्रपटात झळकली होती. यातील सईच्या अभिनयाचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं होतं. ‘मिमी’, ‘भक्षक’नंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’ सीरिजमध्ये सई महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अभिनेता फरहान अख्तर नेटफ्लिक्सवर एक नवीकोरी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्याच्या या सीरिजचं नाव ‘डब्बा कार्टेल’ असून अलीकडेच याची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये मराठीमोळी सई ताम्हणकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘भक्षक’ पाठोपाठ आणखी सीरिज प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याने सध्या २०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वार्थाने खास ठरत असल्याचं बोललं जात आहे.

Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचल्या मिसेस उपमुख्यमंत्री, अमृता फडणवीस यांच्या लूकने वेधलं लक्ष

ड्रग्जचा अवैध व्यापार यावर आधारित या सीरिजचं कथानक असणार आहे. सईसह अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा अनेक बड्या कलाकारांची फौज या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सीरिजची पहिली झलक शेअर करत सई लिहिते, “हा असा डबा आहे की, ज्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही.”

हेही वाचा : Video : उद्धव ठाकरेंसह आदित्य अन् रश्मी ठाकरे पोहोचले जामनगरला, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी खास उपस्थिती

दरम्यान, ही सीरिज नेटफ्लिक्सवर कधीपासून पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. सईने २०२४ या वर्षाची सुरुवात दणक्यात केली असून ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘भक्षक’नंतर आता ती ‘डब्बा कार्टेल’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.