‘गजनी’, ‘हंटर’, ‘भक्षक’ अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून अभिनेत्री सई ताम्हणकरने हिंदी कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये अभिनेत्री झळकणार आहे. सई मूळची सांगलीची आहे. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून तिने मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

चित्रपटाच्या सेटवर काम करताना अनेकदा कलाकारांबरोबर विविध किस्से घडतात. सईला एकदा सेटवर माकड चावलं होतं याचा किस्सा तिने नुकत्याच माशाबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली, “मला एके दिवशी अगदी गोड माकड चावलं होतं. ते फारच लहान होतं. मला प्राणी प्रचंड आवडतात त्यामुळे मी त्या माकडाजवळ जाऊन त्याला ‘हाय…’ बोलत होते. तेवढ्यात त्या माकडाला वाटलं माझ्या हातात काहीतरी खायला आहे आणि ते पटकन माझ्या हाताला चावलं.”

sai tamhankar bought new luxurious car
Video : सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी! लेकीचा आनंद पाहून आई भारावली
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा : Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर खोल समुद्रात डान्स! स्कूबा डायव्हिंग करताना रवी जाधव यांच्या पत्नीचा हटके अंदाज

“हा किस्सा इथेच संपत नाही. जेव्हा तुम्ही इंजेक्शन घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला विचारलं जातं की, कुत्रा कुठे चावला? तेव्हा मी म्हणाले होते, कुत्रा नाही माकड चावलं. त्यावेळी समोरच्या माणसाचा अर्धा वेळ हसण्यात गेला. त्यानंतर मला इंजेक्शन्स घ्यावी लागली. मला आठवतंय माकड चावल्यावर मी एकूण ३-४ इंजेक्शन्स घेतली होती.” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

हेही वाचा : सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

दरम्यान, सई ताम्हणकर नुकतीच सिद्धार्थ चांदेकरबरोबर ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात झळकली होती. याशिवाय येत्या काळात ती ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टल’, ‘ग्राउंड झिरो’ यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.