Tamil Nadu Cricket Association Honors Ravichandran Ashwin : काही आठवड्यांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक विक्रम केला होता. ५०० विकेट्स पूर्ण करणारा अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ नववा खेळाडू ठरला आहे. कसोटी सामन्यात ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ५ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या होत्या. आता या संस्मरणीय आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनचा गौरव केला आहे. रविचंद्रन अश्विन झाला मालामाल - रविचंद्रन अश्विनला एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यासोबतच तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने रविचंद्रन अश्विनला १०० सामने खेळून कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेण्याच्या कामगिरीबद्दल अनेक भेटवस्तूही दिल्या आहेत. अश्विनला ५०० विकेट्स पूर्ण केल्याबद्दल ५०० सोन्याची नाणी, एक चांदीची ट्रॉफी, एक विशेष ब्लेझर (कोट) आणि एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. या सत्कार समारंभात अश्विनची पत्नी आणि मुलीही त्याच्यासोबत मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अश्विनने महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार मानले. तसेच त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाला, "मला मनापासून एमएस धोनीचे आभार मानायचे आहेत. धोनीने मला जे काही दिले. त्यासाठी मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहीन. त्याने मला पहिल्यांदा नवीन चेंडूने ख्रिस गेल समोर गोलंदाजी करण्याची संधी दिली होती." हेह वाचा - WPL 2024 : आरसीबीने जेतेपद पटकावल्याबद्दल प्रतिक्रियांचा महापूर, कोहलीपासून ते लक्ष्मणपर्यंत ‘या’ सर्वांनी केले कौतुक रविचंद्रन अश्विनची कसोटी कारकीर्द - अश्विनच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ६ नोव्हेंबर २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने झाली आणि काही दिवसांनी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर, 'लेडी लक'चा परिणाम आहे की अश्विन इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज म्हणून उदयास आला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १०० सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ५१६ विकेट्स आहेत. याशिवाय त्याने ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ विकेट्स आणि ६५ टी-२० सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या आहेत.