-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ४५ सामन्यांच्या ८२ डावांमध्ये ७८ षटकार मारले आहेत. (Photo Source – Ben StokesX)
-
त्याच्या नावावर २९०७ धावांची नोंद आहे. यामध्ये त्याने ७ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Ben StokesX)
-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने आतापर्यंत ३२ सामन्यांच्या ५४ डावांमध्ये ५१ षटकार ठोकले आहेत. (Photo Source – BCCI X)
-
त्याने आतापर्यंत २५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source – BCCI X)
-
ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २४ सामन्यांच्या ४१ डावात ३८ षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर १५७५ धावा आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Rishabh Pant X)
-
भारताचा यशस्वी जैस्वाल आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ९ सामन्यांच्या १६ डावात २९ षटकार मारले आहेत. (Photo Source – BCCI X)
-
त्याच्या नावावर आतापर्यंत १०२ धावा आहेत. यामध्ये ३ शतके आणि ४ अर्धशतकांची नोंद आहे. (Photo Source – BCCI X)
-
इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो याच्या पुढे आहे, जरी त्याच्याकडे जयस्वालइतकेच षटकार आहेत. त्याने ३५ सामन्यांच्या ६६ डावात २९ षटकार मारले आहेत. (Photo Source – Jonny Bairstow X)
-
त्याच्या नावावर २१९७ धावा आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Jonny Bairstow X)

Snehal Jagtap : ठाकरे गटाला मोठा धक्का, धडाडती तोफ अजित पवारांच्या पक्षात; म्हणाल्या, “पक्षनेतृत्त्वावर नाराज नाही, पण…”