Yashasvi Jaiswal won the ICC Player of the Month award : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत बॅटने शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालला आयसीसीने मोठा पुरस्कार दिला आहे. त्याला फेब्रुवारी महिन्याचा आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला आहे. केन विल्यमसन आणि पाथुम निसांका यांना मागे टाकत त्याने हा पुरस्कार जिंकला. यशस्वीने इंग्लिश गोलंदाजांचा धुव्वा उडवताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ७१२ धावा केल्या होत्या.

यादरम्यान यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून दोन द्विशतके पाहिला मिळाली. याबरोबर त्याने अनेक दिग्गजांचे रेकॉर्डही मोडले. एका कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करणारा यशस्वी हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या बाबतीत हा पराक्रम केवळ सुनील गावसकरच दोनदा करू शकले आहेत.

Shreyovi Mehta
नऊ वर्षाची श्रेयोवी मेहता कशी ठरली ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी?
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Ballon dOr Award Nomination List Announced sport news
मेसी, रोनाल्डो यांना वगळले! बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर
Rehana Sultan, cardiac surgery, cardiac surgery on Rehana sultan,Rohit Shetty Javed akhtar gave financial support Rehana
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, आर्थिक मदतीसाठी बॉलीवूडमधील ‘हे’ लोक मदतीला आले धावून
State Teacher Merit Award Announced How many teachers have been awarded this year
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर… यंदा किती शिक्षक ठरले मानकरी?
samir kunawar, best parliamentarian award,
उत्कृष्ट संसदपटू! आमदार समीर कुणावार यांना पुरस्कार मिळण्याचे कारण काय…
national films awards
National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना भारत सरकार काय बक्षीस देते? जाणून घ्या
National Award for Documentary Varsa
‘वारसा’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार, कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित विषय

यशस्वी जैस्वालने फेब्रुवारी २०२४ चा आयसीसी पुरुष खेळाडूचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला. त्याने न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका यांना मागे सोडले. ज्यांना या पुरस्कारासाठी यशस्वी जैस्वालसह नामांकन मिळाले होते. जैस्वाल हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने फेब्रुवारी महिन्यात सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शानदार द्विशतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IPL 2024 : ऋषभ पंत फिट असल्याची बीसीसीआयची घोषणा! दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार का?

फेब्रुवारीमध्ये यशस्वीची दमदार कामगिरी –

जैस्वाल मायदेशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत इंग्लंडविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये होता, त्याने विझागमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात २१९ धावा केल्या आणि त्यानंतर राजकोटमधील सामन्यात दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून भारताला आघाडी मिळवून दिली होती. जैस्वालच्या या खेळीमुळे भारताला मालिकेतील पहिल्या कसोटीतील पराभवातून सावरता आले. भारताच्या युवा सलामीवीर फलंदाजाने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम केले आणि राजकोटमधील त्याच्या डावात एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार (१२) मारण्याच्या दीर्घकालीन कसोटी विक्रमाची बरोबरी केली.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : मुशीर खानचे ३ महिन्यांत चौथे शतक, सचिन तेंडुलकरचा मोडला ‘हा’ खास विक्रम

२२ वर्षे आणि ४९ दिवसांच्या वयात, यशस्वी हा कसोटीत सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्यानंतर दुहेरी शतके करणारा जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. जैस्वालने फेब्रुवारीच्या अखेरीस तीन कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि २० षटकारांसह ११२ च्या सरासरीने ५६० धावा केल्या. मार्चमध्येही त्याने हा फॉर्म कायम राखला आणि सर्वात जलद १००० कसोटी धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय ठरला