Viral video: कुस्ती खेळाडू म्हटलं कि आपल्याला खाशाबा जाधव यांचे नाव आठवतं. होय खाशाबा म्हणजे १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविणारे पहिले भारतीय. खाशाबा हे मुळचे साताऱ्याचे होते. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात खास करून सांगली सातारा जिल्ह्यात अनेक कुस्ती मैदाने आयोजित केली जातात. कुस्ती मल्ल दारा सिंह हे देखील कुस्तीतील एक नामांकित पैलवान. महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती. होय, कुस्ती खेळ फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खेळल्या जातो. दरम्यान सध्या एक कुस्तीच्या आखाड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला धोबीपछाड केलंय. कुस्तीप्रेमींनो तुम्ही कुस्तीचा असा डाव कधी बघितला नसेल.
हा सामना इतका थरारक झाला की पैलवान आखाडा सोडून पळून गेला. तुम्हालाही कुस्त्या बघायला आवडत असतील तर हा व्हिडीओ नक्की पाहा..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भारदस्त शरीरयष्टी असणाऱ्या या पैलवानानं समोरच्या पैलवानाला अवघ्या ४० सेकंदामध्ये आस्मान दाखवलं. कुस्तीचा सामना सुरु आहे. बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला हा प्रकार असून दोन्ही पैलवान एकमेकांना हरवण्यासाठी आखाड्यात उतरले. यावेळी सामना सुरु असून पुढे काय होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. कारण एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला अक्षरश: उलटं, पालटं करुन हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला विरोध करण्याएवजी समोरचा पैलवान इतका घबरला की तो आखाडा सोडून पळून लागला. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी फडावर जमलेली मंडळी त्याला पुन्हा आखाड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सिंहाने केली गर्जना, मग सिंहीणीने दाखवला इंगा… ‘जंगलच्या राजा’ची झाली बोलती बंद! ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO
शेवटी पंच येतात आणि दोघांनाही समोर उभं करुन निकाल जाहीर करतात. अर्थातच आखाडा सोडन पळून गेलेला पैलवानाचा पराभव होतो.