scorecardresearch

युट्यूब Photos

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More
Bigg boss ott season 3 contestants Sana Saeed Surbhi Jyoti Harsh Beniwal see photos
9 Photos
PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

YouTube
9 Photos
Photos: भारीचं की! आता YouTube Shortsने करता येईल शॉपिंग; जाणून घ्या कंपनीची भन्नाट सुविधा

YouTube आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन आणि खास बदल करणार असून आता YouTube Shorts द्वारे शॉपिंगचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.…

18 Photos
Photos : मधुरा रेसिपीज फेम युट्यूबर झळकल्या ‘सुख म्हणजे…’ मालिकेत; अनुभव शेअर करताना म्हणाल्या “अगदी स्वप्नवत…”

मधुरा बाचल ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शेफ आणि प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारताना दिसत आहेत.