हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याने सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. हरियाणाच्या बहादुरगड भागात एका इमारतीत जोडपे राहत होते. हे जोडपे युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कंटेट तयार करत असत. तसेच लघूपटही तयार करत असत. नुकतेच देहरादूनहून ते आपल्या पाच जणांच्या टीमसह बहादुरगड येथे राहण्यास आले होते. येथील रुहील रेसिडेन्सीमध्ये ते सातव्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रीकरण संपल्यानंतर काल (दि. १२ एप्रिल) रात्री उशीरा जोडपे घरी परतले. रात्री दोघांमध्ये काही कारणामुळे भांडण झाले, त्यानंतर सकाळी सहा वाजता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

69 year old doctor assaulted brutally in kamothe by youth
मोठ्या आवाजात भांडणाऱ्याकडे पाहिल्याने कामोठ्यात डॉक्टराला मारहाण
Pune Porsche car accident What is remand home accused at remand home
बालसुधारगृह म्हणजे काय? पुणे पोर्श अपघातातील आरोपीचा दिनक्रम कसा असेल?
man inhuman torture to his wife in Pimpri-Chinchwad is arrested by police
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Abducted businessmen not found challenge to Akola police
अपहृत व्यावसायिकाचा शोध लागेना, अकोला पोलिसांपुढे आव्हान; माहिती देणाऱ्यास इतक्या रुपयांचे बक्षीस
new york city women assaulted belt
Video : “पट्ट्याने गळा आवळला, दोन गाड्यांमध्ये ओढलं आणि…”, मोठ्या शहरातील घटनेने खळबळ
Suicide, Agripada, building, आत्महत्या,
आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
Girl brutally killed by boyfriend in Mankhurd
मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप
Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

जोडप्याने इमारतीमधून उडी घेतल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच दोघांच्याही कुटुंबाला याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. न्यायवैद्यक शास्त्र तपासणी करणारे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून सीसीसीटी चित्रण आणि इतर पुराव्यांची तपासणी केली गेली.

गारवित आणि नंदिनी दोघेही व्हिडिओ कंटेट तयार करण्यात सक्रिय होते. गारवितने काही चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केले होते. तर नंदिनीही चित्रपटसृष्टीत नशीब अजमावत होती. तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काही सिने कलाकारांबरोबरची छायाचित्रे आहेत.

शनिवारी सकाळी दोघेही एकटेच घरी होते. सोसायटीतील रहिवाश्यांना त्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या मित्रांना बोलाविण्यात आले.