यूट्यूबच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुसान वोजसिकी यांच्या १९ वर्षीय मुलचा मतृदेह आढळला आहे. सुसान यांच्या मुलाचे नाव मार्को ट्रोपर असे असून बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठीताल वसतीगृहात त्याचा मृतदेह आढळला आहे. मार्कोच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ट्रोपरची आजी एस्थर वोसजिकी यांनी मार्कोचा मृत्यू हा ड्रग्जमुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.
मार्कोच्या मित्रांना त्याचा मृतदेह आढळला
मिळालेल्या माहितीनुसार मार्को हा कॅलिफोर्निया विद्यापीठातील वसतीगृहात राहायचा. मात्र अचानकपणे त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मित्रांनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाला कळवली. त्यानंतर बर्कले अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मार्कोला प्रथमोपचार देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याला मृत घोषित करण्यात आले.
मार्कोचा मृत्यू ड्रग्जच्य अतिसेवनामुळे
पोलिसांच्या मतानुसार मोर्कोच्या मृत्यूमागे कसल्याही प्रकारचा घातपात नाही. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज मार्कोच्या आजीने व्यक्त केला आहे. “त्याने ड्रग्जचे सेवन केले आहे. मात्र हा ड्रग्ज कोणता होता, याची आम्हाला निश्चित कल्पना नाही. मात्र त्याने ड्रग्ज घेतले होते,” असे मार्कोच्या आजीने सांगितले.
मार्कोला गणिताची आवड
दरम्यान, मार्कोचे कुटुंबीय शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहात आहेत. याच अहवालातून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. मार्कोला गणिताची आवड होती. त्याचा बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील मित्रपरिवारही मोठा होता. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.