दूरसंचार कंपनी ‘एअरसेल’ने ‘गुड मॉर्निंग’ पॅक सादर केला आहे. या पॅकअंतर्गत वापरकर्त्याला केवळ एक रुपयात सकाळी सहा ते आठ या दोन तासासाठी ‘एअरसेल’ ते ‘एअरसेल’ मोफत ‘लोकल कॉल’ सुविधा मिळेल. ‘एअरसेल’च्या वापरकर्त्याला केवळ एक रुपयाच्या रिचार्जमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. ‘एअरसेल’च्या १३ सर्कलमध्ये ही सुविधा प्राप्त होणार असल्याचे कंपनीने एका निवेदनाद्वारे जाहीर केले. ग्राहकांना अत्यंत कमी दरात अधिक सुविधा प्रदान करण्यासाठी आम्ही ‘गुड मॉर्निंग’ पॅकची घोषणा केली असल्याचे सांगत, या सणासुदीच्या काळात फोन बिलाची चिंता न करता ग्राहकांना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देता याव्यात, हा या मागचा उद्देश असल्याचे ‘एअरसेल’चे मुख्य विपणन आधिकारी अनुपम वासुदेव म्हणाले. विद्यार्थी आणि तरुण नोकरवर्गाचा दिवस लवकर सुरू होतो, त्यांना लक्षात ठेऊन ह्या पॅकची निर्मिती केल्याचेदेखील ते म्हणाले.