भारतातील अणुऊर्जा प्रकल्पावरून वादग्रस्त ठरलेल्या अरेवा या जर्मन कंपनीने जागतिक स्तरावर तब्बल ६,००० मनुष्यबळ कमी करण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीचा अब्जावधी युरो खर्च २०१७ पर्यंत कमी होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. एकूण नोकरकपातीपैकी ४,००० कर्मचारी कपात ही एकटय़ा फ्रान्समध्ये होणार आहे. फ्रान्सबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही कंपनीने यापूवी कामगार खर्च कमी केला होता. कंपनीचा कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च सध्या ४ अब्ज युरोपर्यंत आहे. समूहाच्या ताफ्यात तूर्त ४५ हजार कर्मचारी आहे. त्यातील ३० हजार हे फ्रान्समध्ये आहेत.