News Flash

आस्कमी ग्रूपची कॅटापल्टबरोबर भागीदारी

कॅटापल्ट हे भारतातील सामुदायिक गुंतवणुकीतील (क्राऊड फंिडग) एक मुख्य व्यासपीठ आहे.

नावीन्यपूर्ण व्यवसायिक कल्पनांना पाठबळ देण्याच्या बांधिलकीने कार्यरत आस्कमी पे या आस्कमी समूहातील कंपनीने कॅटापल्ट डॉट कॉमबरोबर धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे.

कॅटापल्ट हे भारतातील सामुदायिक गुंतवणुकीतील (क्राऊड फंिडग) एक मुख्य व्यासपीठ आहे. या भागीदारीनुसार नवोद्यमींना उत्पादनाच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरील आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही पाठबळ दिले जाणार आहे.

सामुदायिक गुंतवणुकीच्या साहाय्याने मूळ नमुन्याच्या विकासाला पािठबा देऊन ई-विक्री आणि उत्पादनाची जाहिरात, निधी गोळा करणे आणि सानुकूल व्यवहार आणि आस्कमी पे अ‍ॅपच्या साहाय्याने सूचना आदींच्या साहाय्याने, भारतातील नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उत्कंठावर्धक उत्पादन अशी साखळी सेवा या भागीदारीतून निर्माण होईल.

नवा उपक्रम प्रस्थापित करणाऱ्या उत्पादनाला, आस्कमी फिन या आस्कमी ग्रूपवरील एसएमई फायनािन्सग उपक्रमाअंतर्गत सुलभ वित्तसेवेसाठी पात्र ठरवून सर्वसमावेशक सेवा पुरविली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 5:48 am

Web Title: askami partnership with the group catapult
Next Stories
1 जॉयस्टरद्वारे ठाणे पोलीस आयुक्तालयात मोफत वाय-फाय सुविधा
2 मोटर विमा दाव्याच्या सव्रेक्षणासाठी ‘फ्यूचर जनराली’चा डिजिटल प्रघात
3 अपेक्षेप्रमाणे रेपोदरात कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
Just Now!
X