मुंबई : दि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) ने आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत ३ अब्ज डॉलरच्या विदेशी कर्ज उभारणीचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.

चालू वित्त वर्षांत बँक १.७ अब्ज डॉलरची विदेशी कर्ज उभारणी करत आहे. आधी जाहीर केलेल्या १० अब्ज डॉलरच्या जागतिक स्तरावरील निधी उभारणी कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत, एक अब्ज डॉलरच्या रोख्यांची नोंदणी गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंजच्या मंचावर झाली.

याप्रसंगी एक्झिम बँकेचे व्यवस्थापकीय संचालक द्रविड रस्किन्हा, बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी हर्षां बंगारी, इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. बालसुब्रमण्यम आदी यावेळी उपस्थित होते.