बहुतांश कंपन्यांच्या आरोग्य विमा आणि मेडिक्लेम पॉलिसीच्याही बाहेर असलेल्या दंतोपचारावर प्रसंगी खूप मोठा होणाऱ्या खर्चाचा भार सामान्य पगारदारांच्या कुवतीबाहेरचा असतो. तथापि देशातील सर्वात मोठी दंत चिकित्सालयांची साखळी असलेल्या ‘मायडेन्स्टिस्ट’ आणि बजाज फिनसव्‍‌र्ह यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्याने आता संपूर्ण व्याजमुक्त सुलभ हप्त्यातील कर्जसाहाय्य दंत रुग्णांना उपलब्ध झाले आहे.
बजाज फायनान्सची ही सुविधा एकूण उपचार खर्च १५,००० रुपयांपेक्षा वर असलेल्या रुग्णांना मिळू शकेल. त्यांना उपचार खर्चाचा ३३ टक्के हिस्सा मात्र आगाऊ भरावा लागेल व उर्वरित रक्कम कर्जाऊ घेऊन त्याची आठ समान हप्त्यात कोणतेही व्याज न भरता परतफेड करता येईल.
‘मायडेन्टिस्ट’ने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, ठाणे, वाशी येथील आपल्या चिकित्सालयांमध्ये ही योजना सुरू केली आणि पहिल्या काही दिवसांत २०० रुग्णांनी या सेवेचा लाभही उचलला आहे.

 

‘कॉन्कॉर’ची आज हिस्सा विक्री
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीची पाच टक्केभाग विक्री प्रक्रिया यशस्वी ठरल्यानंतर सरकारने कॉन्कॉर (कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मधील निर्गुतवणुकीची मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. माल वाहतूक क्षेत्रातील सार्वजनिक कंपनीतील ५ टक्के हिस्सा विकून सरकार १,१६५ कोटी रुपये उभारणार आहे. कॉन्करचे किमान समभाग मूल्य १,१९५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारअखेर बंद झालेले मूल्य १,२२६.६५ रुपये होते.