पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने सोमवारी बँकेच्या डिसेंबर तिमाही आणि ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या नऊ  महिन्यांच्या आर्थिक निकालांना मुख्यालयातील बैठकीत मंजुरी दिली.

बँकेचा कायान्वयन नफा रु. ८४२ कोटी झाला असून ही वाढ ९५% आहे. बँकेचा निव्वळ नफा रु. १३५ कोटी असून वार्षिक आधारावरील रु. ३,७६४ कोटी तोटय़ाच्या पार्श्वभूमीवर हा नफा आहे. नफ्यामधील ही वाढ बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न, मोठय़ा प्रमाणात केली गेलेली जोमदार वसूली आणि बँकेने घातलेल्या खर्चावरील नियंत्रणामुळे ही वृद्धी साध्य झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आली.

बँकेचे व्याज उत्पन्न रु. ३,०१६ कोटीने वाढले असून वृद्धी १४% आहे. निव्वळ व्याज उत्पन्न रु. १,१८६ कोटी असून ही वाढ ३६% आहे. व्याजेतर उत्पन्न रु. ४४२ कोटी झालेली असून ही वाढ ८% आहे. ठेवींवरील मूल्य घसरले असून ती ५.०१% च्या तुलनेत ४.८१% आहे.

निव्वळ व्याजामधील अंतरामध्ये देखील २.४१% च्या तुलनेत २.८६% वाढ झाली आहे. मूल्य आणि उत्पन्न यांचे गुणोत्तर डिसेंबर २०१८-१९ तिमाहीच्या ४८% तुलनेत वाढून डिसेंबर २०१९-२० तिमाहीमध्ये ६६% झाले आहे.

कार्यान्वयन नफ्यामध्ये रु. २,२५२ कोटी वाढ झाली असून ही वृद्धी ३३% आहे. निव्वळ नफ्यामधील वाढ रु. ४,८५६ कोटी तोटय़ाच्या तुलनेत रु. ३३१ कोटी झाली आहे. व्याज उत्पन्न वाढून रु. ८,६८९ कोटी झाले असून ही वाढ ७.६१% आहे. निव्वळ व्याज उत्पन्न वाढलेले असून ते रु. ३,२५६ कोटी आहे आणि ही वाढ १९.१२% आहे. व्याजेतर उत्पन्न वाढून ते रु. १,२५७ कोटी झाले असून ही वाढ ८.२१% आहे.

निव्वळ व्याजामधील अंतर २.५०% च्या तुलनेत वाढून २.६८% झाले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ३१ डिसेंबर २०१९ अखेर २,३५,८६७ कोटी झाला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात ४.५५% वाढ दर्शवली आहे.

बँकेच्या एकूण ठेवींमध्ये रु. १,४१,९८६ कोटींची वृद्धी झालेली असून ही वाढ ४.४% आहे. बँकेच्या बचत आणि चालू खात्यातील ठेवी (कासा) गेल्या तिमाहीअखेर रु. ६८,२४६ कोटी झाल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यात ७.०४% वाढ झाली आहे. एकूण ठेवींमधील कासा ठेवींच्या प्रमाणात ४६.८८% च्या तुलनेत यंदा ४८.०७% झाल्याची नोंद आहे.