अपेक्षेपेक्षा चांगला जीडीपी डाटा, वाहन विक्रीमध्ये तेजी आणि लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता, याचा एकत्रित परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला. मुंबईत शेअर बाजारात सेन्सेक्सने मंगळवारी ऐतिहासिक उच्चांक गाठला.

मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५०० पेक्षा जास्त अंकाच्या वाढीसह ४४,६५५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १४० अंकांची वाढ नोंदवली. निफ्टी १३,१०९ अंकांवर बंद झाला.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. गेल, सन फार्मा, इंडसइंड बँक, ओएनजीसी, टेक महिंद्रा आणि यूपीएलच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. नेस्ले, कोटक महिंद्रा बँक, टायटन, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.