मुंबई : रिझर्व्ह बँकेने बॉम्बे मर्कंटाइल सहकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी या सहकारी बँकेवर ५० लाख रुपयांचा दंड शुक्रवारी ठोठावण्यात आला आहे.

बॉम्बे मर्कंटाइल बँकेने ठेवींवरील व्याज दराबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. बँकेने अनिवासी भारतीयांकडून उघडल्या जाणाऱ्या एनआरई मुदत ठेवींवर जास्त व्याज देऊ  केले आहे. या मुदत ठेव खात्यांमध्ये अनिवासी भारतीय परदेशी चलनातील रक्कम        गुंतवतात आणि परदेशी चलन रुपयाच्या मूल्यात परिवर्तित केले जाते. सहसा, एनआरई मुदत ठेव ही परदेशी उत्पन्न देशात हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाते आणि ती पूर्णपणे करमुक्त असते.

रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन करीत बँकेने विनातारण असुरक्षित कर्जेदेखील मंजूर केली आहेत.