26 September 2020

News Flash

बरसला!

सलग तीन सत्रातील घसरणीसह गेल्या दोन महिन्याच्या नीचांकातून बाहेर येताना मुंबई शेअर बाजार सप्ताहअखेर चांगलाच बरसला. डॉलरच्या तुलनेत पुन्हा भक्कम होऊ पाहणारे स्थानिक चलन आणि

| June 15, 2013 12:07 pm

सलग तीन सत्रातील घसरणीसह गेल्या दोन महिन्याच्या नीचांकातून बाहेर येताना मुंबई शेअर बाजार सप्ताहअखेर चांगलाच बरसला. डॉलरच्या तुलनेत पुन्हा भक्कम होऊ पाहणारे स्थानिक चलन आणि मेमधील घाऊक किंमत निर्देशांक अर्थात महागाई दर नरमल्याने व्याजदर कमी होण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला पुन्हा १९ हजारावर नेऊन ठेवले. एकाच सत्रात ३५०.७७ अंशांची मजल मारताना मुंबई निर्देशांक १९,१७७.९३ पर्यंत झेपावला.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण सोमवारी, १७ जून रोजी जाहिर होत आहे. यंदा व्याजदर कपातीला वाव मिळावा, असे मेमधील महागाईचे घसरते आकडेही शुक्रवारी स्पष्ट झाले. खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही व्याजदर कपातीसाठी मध्यवर्ती बँकेवर दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे व्याजदर कपातीसाठी आधीच प्रतिक्षित असलेल्या उद्योग क्षेत्राचीही उत्सुकता ताणली गेली आहे. याचे परिणाम भांडवली बाजारावरही सप्ताहअखेर दिसून आले. गुंतवणूकदारांनी सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी समभागांची जोरदार खरेदी चालविली. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांना त्यांनी सकारात्मकता नोंदविण्यास भाग पाडले. तेही एकाच व्यवहारात ९० हजार कोटी रुपयांनी मालामाल झाले.
आठवडाभर अशक्त बनत चाललेल्या रुपयामुळे भांडवली बाजारानेही ६१३.७७ अंशांचे नुकसान सोसले आहे. असे करताना सेन्सेक्स गेल्या दोन महिन्याच्या नीचांकाची नोंद करतानाच १९ हजाराच्याही खाली गेला होता. शुक्रवारी सुरुवातीपासूनच बाजाराची वाटचाल तेजीच्या दिशेने सुरु होती. सकाळच्या व्यवहारातच सेन्सेक्स १९ हजाराच्या दिशने निघाला. यावेळी तो १८,९५९.८३ वर होता. जागतिक शेअर बाजारातील अनेक प्रमुख निर्देशांकाच्या जोरावर प्रमुख मुंबई निर्देशांक दिवसभरात १९,२१३.१० पर्यंत स्वार झाला होता. महागाईचे नरम आकडे जाहिर होतातच त्याने दिवसअखेरही त्याचे स्वागत गुरुवारच्या तुलनेत १.८६ टक्के वाढीसह केले.
राष्ट्रीय शेअर बाजारातही शतकी वाढ नोंदली गेली. १०९.३० अंश भर टाकत निफ्टी ५,८०८.४० पर्यंत पोहोचला. तर एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स-४० निर्देशांक २०७.०९ अंश वाढीसह ११,३८६.४५ पर्यंत पोहोचला.

↑  जेट एअरवेजमधील इतिहादच्या हिस्सा खरेदी प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची घटका कंपनीच्या समभागाच्या शुक्रवारी पथ्यावर पडली. जेट-इतिहाद हिस्सा खरेदी व्यवहाराला द्यावयाची संमती विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने लांबणीवर टाकल्याने मुंबई शेअर बाजारात जेटचा समभाग दिवसअखेर ९ टक्क्यांनी उंचावला. २,०५८ कोटी रुपयांच्या या व्यवहारापोटी कंपनी समभाग ४७० रुपयांपर्यंत गेला. बाजारातील व्यवहार संपल्यानंतर मंडळाने याबाबतचा प्रस्ताव लांबणीवर टाकला असला तरी कंपनी समभाग मूल्य मात्र भाव कमावून बसले.
जेट एअरवेज : रु.४६९.२०        

↓  समभाग मूल्य आपटीच्या गर्तेतून अपोलो टायर्स दुसऱ्या दिवशीही सावरला नाहीच. अमेरिकन टायर कंपनी रोखीच्या व्यवहारासह ताब्यात घेतल्याने अपोलोचे कर्ज फुगणार असल्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी गुरुवारी कंपनी समभागाला त्याच्या वर्षांच्या नीचांकावर आणून ठेवेल होते. दुसऱ्या दिवशी ताबा प्रक्रियेची औपचारिक घोषणा करताना कंपनीने या कर्जाबद्दल चिंता नसल्याचे स्पष्ट केले असले तरी कंपनीचा समभाग घसरणीतून मात्र सावरू शकला नाही. शुक्रवारी कंपनी समभाग गुरुवारच्या तुलनेत कमी मात्र २५.४३ टक्क्यांनी खालावला.
अपोलो टायर्स : रु. ६८.६०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:07 pm

Web Title: bse sensex up 351 pts inflation indian rupee revive rbi rate cut talk hindalco shares soar
Next Stories
1 श.. शेअर बाजाराचा : ‘पॅन’विषयी बोलू काही..
2 रिझव्‍‌र्ह बँक-सरकारच्या र्निबधानंतरही सोने-आयात घट अशक्य
3 पुढाऱ्यांनी बुडविलेल्या बँकांसाठी महाराष्ट्र शासनाचे १७० कोटींचे दान
Just Now!
X