दळणवळण क्षेत्रातील गेटवे डिस्ट्रिपार्क्‍स लिमिटेडने प्रवर्तित केलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्स लिमिटेडने येत्या मंगळवार, २६ ऑगस्टपासून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एकूण ४.२ कोटी भांडवली समभागांची प्रारंभिक भागविक्री बुक बििल्डग प्रक्रियेद्वारे प्रस्तावित केली आहे. भागविक्रीसाठी किंमतपट्टा प्रत्येकी ४४ रुपये ते ४७ रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. या भागविक्रीचे कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलात २५.२३ टक्के योगदान असेल. किमान ३०० समभागांसाठी आणि त्यानंतर ३००च्या पटीत या भागविक्रीत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. या भागविक्रीला ‘क्रिसिल’कडून ४/५ मानांकन देण्यात आले असून, भागविक्री प्रक्रियेसाठी एचडीएफसी बँक लिमिटेड बुक रिनग लीड मॅनेजर आहे. विक्रीपश्चात समभागांचे बीएसई आणि एनएसई या शेअर बाजारांमध्ये सूचिबद्धता प्रस्तावित आहे. गेटवे डिस्ट्रिपार्क्‍ससह स्नोमॅनच्या अन्य भागधारकांमध्ये मित्सुबिशी कॉर्पोरेशन, मित्सुबिशी लॉजिस्टिक्स कॉर्पोरेशन, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि नॉर्वेस्ट व्हेन्चर पार्टनर्स ७-ए मॉरिशस यांचा समावेश आहे. कंपनीकडून देशभरात १४ ठिकाणी २३ तापमान नियंत्रक गोदामांचा समावेश आहे आणि ३१ मार्च २०१४ पर्यंत, कंपनीच्या ताफ्यात ३०७ भाडे तत्त्वावरील व ६३ स्वतची वाहने अशी ३७० रीफर वाहने आहेत.

नॅशनल बल्क हँडिलग असोसिएशनच्या  अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर
मुंबई: कृषी क्षेत्रासाठी साठवण व गोदामांची सेवा देणारी देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी असलेल्या नॅशनल बल्क हँडिलग असोसिएशन (एनबीएचसी)ने विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांची स्वतंत्र संचालक आणि अध्यक्ष म्हणून नेमणूक करून आपले मंडळ अधिक सक्षम केले आहे. कंपनीने यापूर्वी वित्त मंत्रालयातील आíथक सल्लागार म्हणून काम केलेल्या डॉ. अजय एन. शहा यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.या नियुक्त्यांबद्दल बोलताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चौधरी म्हणाले, ‘‘या दोन प्रख्यात व्यक्तींच्या नियुक्त्यांमुळे आमच्या मंडळाला या व्यक्तींच्या अनुभवाचा व तज्ज्ञतेचा फायदा होईल आणि फक्त कंपनीबद्दलच नव्हे, तर संपूर्ण शेतकी-पुरवठा शृंखलेमधील विश्वासार्हता द्विगुणित होण्यात मदत होईल.’’डॉ. केळकर म्हणाले की, भारताने शेतकी क्षेत्रात अजून भरीव कामगिरी करून दाखवण्याची आणि शेतकी मूल्य शृंखलेमध्ये सक्षम संस्थांची उभारणी करण्याची गरज आहे. एनबीएचसी हे अ‍ॅग्री-वेअरहाऊसिंग क्षेत्रामधील नामवंत नाव आहे आणि बाजारातील संधींचा लाभ घेण्याकरिता ते सुसज्ज आहेत.

‘ईझीमूव्ह’ला भांडवली गुंतवणुकीचे पाठबळ
पुणे: घर व कार्यालय बदलावे लागल्याने स्थलांतराच्या प्रक्रियेत सामानाची हलवाहलव विनासायास करून देणारी सेवा असलेल्या पुणेस्थित ‘ईझीमूव्ह’ या कंपनीने अमेरिका, युरोप व भारतातील ‘एंजल’ गुंतवणूकदारांच्या चमूकडून १ कोटी रुपये गुंतवणुकीचे पाठबळ उभे करण्यात यश मिळविल्याचे जाहीर केले आहे. हा निधी प्रामुख्याने हेज फंड मॅनेजर्सकडून उभारण्यात आला आहे. आनंद अगरवाल आणि विश्वजीत सिंग यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये वर्षभरापूर्वी स्थापित केलेल्या या कंपनीने आजवर १००० जणांना समाधानकारक सेवा दिली आहे. कंपनीच्या सेवेचा व्याप वाढत असताना, उत्तर भारताच्या बाजारपेठेत विस्ताराचे तिचे पाऊल पडत असताना, हे नेमक्या वेळी मिळालेले आर्थिक पाठबळ कामी येईल, अशी सह-संस्थापक आनंद अगरवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘आयआरबी’च्या हरयाणातील २३०० कोटींच्या महामार्ग प्रकल्पाची पंतप्रधानांकडून कोनशिला
मुंबई: आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कैथाल-राजस्थान सीमा विभागाच्या हरयाणा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग टप्पा क्रमांक चार अंतर्गत रस्तेमार्गाचा कोनशिला समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळीहरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री कृष्णपाल सिंग, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. पी. सिंग आदी उपस्थित होते. ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावरील १६६ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २,३०० कोटी रुपये खर्च येणार असून ९१० दिवसांमध्ये काम पूर्ण करावयाचे आहे. हरयाणाच्या माध्यमातून आयआरबीने देशातील सातव्या राज्यात कंपनीचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.

थकीत कर्जामुळे महिला शताब्दी बँकेवर र्निबध
ठाणे: थकित कर्जाचे प्रमाण वाढल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने ठाण्यातील महिला शताब्दी बँकेच्या व्यवहारावर र्निबध आणले असले तरी ठेवी सुरक्षित असल्याचा दावा अध्यक्षा डॉ.  कल्पना हजारे यांनी केला आहे. कर्जवसुली होईपर्यंत ग्राहकांना त्यांच्या खात्यातून सहा महिन्यातून एकदा केवळ एक हजार रूपये काढता येणार आहेत.  बँकेकडे १६ कोटींच्या ठेवी असून २ कोटी ९५ लाख रूपयांची कर्ज थकित आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात कर्ज वसुली करण्याचे किंवा अन्य बँकेत विलीन होण्याचा पर्याय रिझव्‍‌र्ह बँकेने सुचविला असल्याचेही त्यांनी सांगितले. २००३ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेची नौपाडा येथे एकमेव शाखा आहे.