आशिष कुमार चौहान व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई शेअर बाजार

२०१८ मध्ये भरतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरापेक्षा अधिक होता. नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत नि:श्चलनिकरण आणि वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊनदेखील भारतीय अर्थव्यवस्थेने वृद्धीदर कायम राखला. भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता सध्याच्या वृद्धीदरापेक्षा (७.५०-८.०० टक्कय़ांपेक्षा) अधिक वेगाने वाढण्याची नक्कीच आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असतो. २०१८ मध्ये अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढली असती; परंतु कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात खीळ बसली.

२०१९ मध्येदेखील भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल या बद्दल शंका घेण्याचे कारण नाही. सध्याच्या पातळीवर असलेले कच्च्या तेलाचे भाव भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरासाठी योग्य पातळीवर आहेत.

कच्च्या तेलाचे दर ४० डॉलर प्रतीपिंप किंवा त्या पेक्षा कमी राहिले तर अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वृद्धी दरापेक्षा अधिक वेगाने वाढेल ५० ते ६० डॉलर दरम्यान राहिले तर अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सध्याच्या म्हणजे ७.५०-८.०० टक्कय़ांदरम्यान असेल. कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रतीपिंप या दरापेक्षा अधिक वाढले तर वृद्धीदर ७ टक्कय़ांखाली घसरण्याची शक्यता आहे.

ग्राहक उपयोगी उपभोग्य वस्तू, पायाभूत सुविधा ही भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने वाढणारी उद्योग क्षेत्रे असतील. आपल्याकडे निर्यात करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत मोठय़ा प्रमाणावर नाहीत. माहिती तंत्रज्ञान संबंधित उद्योगातून भारताला मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळते. त्या खालोखाल अनिवासी भारतीयांची बचत हा मोठा परकीय चलनाचा स्त्रोत आहे. भारत हा जगाला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणारा देश आहे. या अनिवासाठी भारतीयांच्या बचतीतून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळते.

आगामी वर्षांत बीएसइ उर्जेसंबंधित व्यवहारांसाठी मंच (एनर्जी एक्स्चेंज (सुरू करणार आहे. ‘बीएसई स्टार एमएफ’ हा म्युच्युअल फंड व्यवहारासाठी असलेल्या या मंचावरील व्यवहारांनी सर्वात अधिक वृद्धी दर गाठला. म्युच्युअल फंड उद्योगाची वेगाने वाढ झाल्याचा फायदा आमच्या ‘बीएसई स्टार एमएफ’ या मंचाला झाला.

आमच्या मंचाचा म्युच्युअल फंड ऑनलाईन व्यवहारापैकी २५ टक्के वाटा आहे. आम्ही नि:संशय म्युच्युअल फंड व्यवसायाचे नेतृत्व करतो. आगामी वर्षांत आम्ही म्युच्युअल फंड ऑनलाईन व्यवहारापैकी किमान ५० टक्के हिस्सा काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतानाच आम्ही अधिकाधिक गुंतवणूकदारस्नेही सेवा देत राहू. तंत्रज्ञांचा अधिकाधिक वापर मुंबई शेअर बाजार निश्चितच करेल अशी ग्वाही देतो.