करोना साथ आणि टाळेबंदी यामुळे सात महिने ठप्प पडलेला देशातील किरकोळ विक्री व्यवसाय पूर्वपदावर येऊ पाहत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर टाळेबंदीतील शिथिलता आणि लांबणीवर पडणारा लग्नहंगामाची आता चाहूल आहे. वस्त्र प्रावरणे क्षेत्रातील आघाडीच्या रेमंड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष गौतम हरी सिंघानिया यांनीही हा व्यवसाय कोविडपूर्व स्थितीत येण्यास सण-लग्नादी हंगाम निमित्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

किरकोळ/वस्त्रोद्योग बाजारपेठेसाठी नजीकचा अथवा दीर्घकालीन दृष्टिकोन काय आहे?

करोना साथीनंतर टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत असल्याने या क्षेत्रात बदल झाला आहे. आज आमची ९५% पेक्षा जास्त किरकोळ दालने पूर्णपणे कार्यरत आहेत. उत्सवाचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम नजीक असताना आपण पुनरागमन करत आहोत. हा व्यवसायही लवकरच पूर्वपदावर येईल, असा मला विश्वास आहे.

करोनामुळे या क्षेत्रावर/उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे..

चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीत कापड व वस्त्र उद्योगाने कटू अनुभव घेतले आहेत. पुरवठा साखळी व व्यवसाय पूर्ण बंद झाल्याने या साथीचा परिणाम किरकोळ व्यवसायावर झाला आहे. तथापि, टाळेबंदीचा विस्तार झाल्याने उद्योग आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्व आता पूर्वपदावर येऊ पाहत आहे. कठोर टाळेबंदीदरम्यान आम्ही ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ नोंदविली आहे. किरकोळ उद्योगानेही त्वरित परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.

किरकोळ उद्योगासाठी कोविडमुळे कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?

या दरम्यान सुरक्षित अंतर, ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांप्रतिच्या उपाययोजना आदी आगामी काळातही आवश्यक आहे. कोविड-१९ने साहित्य पुरवठा साखळी विस्कळीत केली आहे आणि उद्योगांना अस्थिरतेचा सामना करण्यासाठी तत्परतेसाठी धोरणांवर पुनर्विचार करण्यास उद्युक्त केले आहेत. उद्योग पुढे जाणे म्हणजे लहान चक्रांशी जुळवून घेईल. यामुळे कार्यशील भांडवलाची नोंद होईल.

रेमंडने कसे जुळवून घेतले?

रेमंड त्याच्या निष्ठावंत ग्राहक तत्त्वाशी जुळवून घेण्यात सक्रिय आहे. संकटप्रसंगी रेमंडसारख्या जबाबदार नाममुद्रेला आपल्या दुकानदारांमधील आत्मविश्वास वाढवावा लागतो. आमच्याकडे आमच्या सर्व वस्त्रोद्योग आणि कपडय़ांच्या नाममुद्रेसाठी आमच्या किरकोळ दालनांमध्ये खूप कठोर नियम अनुसरावे लागले. आमचा प्रयत्न आमच्या खरेदीदारांना एक सुरक्षित खरेदी अनुभव प्रदान करण्याचा आहे. सक्षमतेसाठी आम्ही थेट सेवाही सुरू केली आहे.

कंपनीचा तंत्रस्नेही परिवर्तन आणि भविष्याचा मार्ग कसा असेल?

रेमंड एक संपूर्ण परिसंस्था तयार करीत आहे. ती डिजिटल (तंत्रस्नेही) असेल. व्यापार-भागीदार मोठय़ा प्रमाणात नोंदणीसाठी आणि अन्य संबंधित क्रियाकल्पांसाठी तंत्रस्नेही मंचशी जुळवून घेत आहेत. आम्ही आमच्या ओम्नी-चॅनेल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना वेगवान व प्रभावी सेवा देता येते. विविध ६०० हून अधिक शहरांमध्ये आमच्या १,५०० दालनांचे जाळे आहे.

काही विस्तार योजना आहेत का?

काही वर्षांपासून एक रचनात्मक कार्यप्रणाली रूपांतरित केली आहे आणि छोटय़ा शहरांमध्ये आमच्या किरकोळ दालनांचे जाळे विस्तृत केले आहे. ६०,००० पेक्षा जास्त शहरांमध्ये आमची उपस्थिती असल्याने आम्ही आधीपासूनच देशभरातील अस्तित्व असलेला समूह आहोत.

यंदाच्या उत्सवाच्या हंगामापासून तुमच्या काही अपेक्षा आहेत का?

काही दिवसांमध्ये ग्राहकांच्या मागणीत वाढ झाली आहे. आमच्या किरकोळ दालनातील त्यांचे आगमन, वस्तूंसाठी विचारणा व प्रत्यक्ष खरेदी यातून ते जाणवते. मी आधी सांगितल्याप्रमाणे, मला या व्यवसायातून नजीकच्या कालावधीत किरकोळ परतावा अपेक्षित आहे. सण-उत्सव आणि लग्नाचा हंगाम या व्यवसायासाठी निश्चितच वृद्धीचा मार्ग दाखवेल.