कर्जओझ्याने डबघाईला आलेल्या इटलीची राष्ट्रीय हवाई सेवा कंपनी ‘अलइटालिया’मध्ये संयुक्त अरब अमिरातस्थित एमिरेट्स एअरलाइन आणि एतिहाद एअरवेज यांनी संयुक्तपणे ४९ टक्के भांडवली मालकी मिळवीत असल्याचे बुधवारी जाहीर केले. या संबंधीचा अधिकृत करार झाला असला तरी यासाठी किती मोबदला दिला जाईल, अथवा अलइटालियाच्या अवनतीस कारण ठरलेला कर्जाचा डोंगर आणि तिच्या अतिरिक्त मनुष्यबळाचे काय केले जाणार, याबद्दल उभय पक्षांकडून कोणताही तपशील दिला गेला नाही.