भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाअंतर्गत, एनर्जी इफिसियन्सी सव्‍‌र्हीसेस लिमिटेड (ईईएसएल) ही उर्जा सेवा कंपनी असून या कंपनीने महाराष्ट्रातील विविध परिमंडळांमध्ये डोमेस्टीक इफिशियन्ट लायटींग प्रोग्रम (डीईएलपी) ही मोहिम अगदी यशस्वीपणे राबविली आहे. सुरुवातीपासून 74.8 लाखांपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले आहे. उर्जा बचत आणि उर्जेचा योग्य वापर करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे परिवर्तन करण्यासाठी राज्यातील जनता मोठय़ा प्रमाणात या मोहिमेत सहभागी होत आहे.
डीईएलपी योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील ग्राहक रोख रक्कम भरुन प्रतीकुटुंब १० एलईडी दिवे खरेदी घेण्याचा लाभ मिळवू शकतील. तांत्रिकदृष्या सर्वोत्तम असणारे हे एलईडी दिवे १०० रुपयांना एक अशा सवलतीच्या दरात मिळत आहेत (त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३५० रुपये आहे).
कोणत्याही तांत्रिक दोषामुळे हा एलईडी दिवा खराब झाल्यास ईईएसएल कंपनी पुढील तीन वर्षांच्या काळासाठी अगदी मोफत बदलून देते.
जवळच्या वितरण केंद्र्राद्वारे किंवा स्थानिक पातळीवर नियुक्त केलेला किरकोळ विक्रेता हे खराब दिवे बदलून देईल. दिव्यांच्या वितरण कालावधीत, शहरात सुरु असलेल्या वितरण केंद्र्रातूनही खराब दिवे बदलून दिले जातील.
डीईएलपी उपक्रमात वितरित केलेले दिवे ग्राहकांचे दरवर्षी १६० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यत बचत करतात, शिवाय २५,००० तासांचे आयुर्मान प्रत्येक दिवाला आहे, त्यामुळे एक वर्षांच्या आत या दिव्याची किंमत वसूल होते.
या दिव्यांची खरेदी किंमत ७५% पर्यत कमी करण्यात ईईएसएल कंपनीला यश आले असून हा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहचविला जात आहे. याशिवाय उर्जा बचत करणार्या या एलईडी दिव्यासाठी निरंतर बाजारपेठ असल्याने, ७ वॅटच्या एलईडी दिव्याची किरकोळ विक्रीची किंमत आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे (सध्या त्याची किंमत ३०० रुपये आहे).
डीईएलपी उपक्रमाची सुरुवात जुल २०१५ मध्ये झाली असून गेल्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात ७४.८ लाखांपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचे वितरण झाले आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्टात हे दिवे वापरणार्या ग्राहकांना मोठय़ा बचतीचा लाभ मिळाला आहे.