News Flash

वार्षिक पाच लाख कार विक्रीचे ह्य़ुंदाईचे लक्ष्य

मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाने वर्षांला पाच लाखांहून अधिक वाहने विकण्याचा संकल्प सोडला आहे.

| February 19, 2015 03:25 am

मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाने वर्षांला पाच लाखांहून अधिक वाहने विकण्याचा संकल्प सोडला आहे. कंपनीने गेल्याच वर्षांत ४.११ लाख वाहने विकली होती. ह्य़ुंदाईच्या १२.१९ लाख रुपयांच्या नव्या व्हर्नाच्या सादरीकरणाप्रसंगी कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी येत्या वर्षांतील पाच लाख वाहनविक्रीचा मनोदय व्यक्त केला. नव्या व्हर्नासह कंपनीच्या एलाईट आय२० या क्रॉस ओव्हर श्रेणीतील वाहनाच्या जोरावर ह्य़ुंदाईचा वाहनविक्रीचा विश्वास बळावला आहे. महिन्यालाच सध्या लाखभर प्रवासी कार विक्री करणारी मारुती सुझुकी देशात आघाडीवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2015 3:25 am

Web Title: hyundai launches updated version of mid sized sedan verna
टॅग : Car,Hyundai
Next Stories
1 १० हजार कोटींसाठी इतकी कसरत तर,गुंतवणूकदारांचे ३० हजार कोटी कसे देणार?
2 नियोजनबद्ध शहरेच शाश्वत प्रगतीचे नेतृत्व करतील
3 प्राप्तिकर सवलत मर्यादा वाढवा, बचतीला प्रोत्साहन मिळवा!
Just Now!
X