23 September 2020

News Flash

जागतिक बँकेचे सौर ऊर्जा क्षेत्रात एक अब्ज डॉलरचे साहाय्य

मोदी सरकारचे भविष्यातही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह अन्य काही क्षेत्रांना प्राधान्य असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा क्षेत्रात भारताचे उल्लेखनीय कार्य सुरू असल्याचे कौतुकोद्गार काढतानाच या क्षेत्राकरिता १ अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी जाहीर केले.
गेल्या दोन दिवसांपासून भारत दौऱ्यावर असलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यांग किम यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.
मोदी सरकारचे भविष्यातही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह अन्य काही क्षेत्रांना प्राधान्य असेल. पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील देशाची निर्भरता नजीकच्या कालावधीत कमी होईल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याचा भारतात सौर ऊर्जानिर्मितीसाठी उपयोगी होईल. छतावरील सौर पट्टीका, सौर उद्यानांसाठी लागणारी पायाभूत सुविधा, सौर राज्यांकरिता पारेषण वाहिन्या यांच्यासाठी हा निधी खर्च होईल.
भारतासह १२१ देशांबरोबर आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याकरिता जागतिक बँकेने करार केले आहेत. याद्वारे २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरचा निधी उभारण्यात येणार आहे.
सौर ऊर्जेद्वारे भारताने २०२२ पर्यंत १ लाख मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे लक्ष्य राखले आहे. जागतिक बँकेने भारताच्या सौर क्षेत्राला केलेले १ अब्ज डॉलरचे सहकार्य हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे आहे. २०१५ ते २०१६ दरम्यान भारताने जागतिक बँकेकडून ४.८ अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 8:09 am

Web Title: indian solar energy to get 1 bn from world bank
Next Stories
1 सेन्सेक्सची २७ हजार तर निफ्टीची ८,३००ला गवसणी
2 भारतीयांच्या काळ्या पैशाचा ‘स्विस’ ओघ आटला!
3 पायाभूत सेवा क्षेत्राचा विकास पाच महिन्यांच्या तळात
Just Now!
X