आधीच्या महिन्यात, डिसेंबर २०२० मध्ये किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक (महागाई दर) ४.५९ टक्के होता. याच कालावधीतील ३.४१ टक्क्यांवरून यंदाच्या जानेवारीत अन्नधान्याच्या किमती १.८९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या.

यंदाचा महागाई दर गेल्या १६ महिन्यांच्यात तळात विसावला आहे. महागाईचा जानेवारीमधील ४ टक्के दर हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील टप्प्यावरील आहे.

मार्च २०२० मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन १८.७ टक्क्यांपर्यंत रोडावले होते. ऑगस्ट २०२० पर्यंत ते उणे स्थितीत राहिले. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये ते अनुक्रमे १ व ४.२ टक्क्यांपर्यंत वाढले. तर नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा घसरून २.१ टक्के  झाले.

शुक्रवारी जाहीर झालेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये खनिकर्म क्षेत्रात मात्र ४.८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर ऊर्जानिर्मिती ५.१ टक्क्यांनी वाढली आहे.