धकाधकीचे जीवनमान, आरोग्यनिगेसाठी येणारा प्रचंड खर्च या पाश्र्वभूमीवर आज प्रत्येकासाठी आरोग्यविमा ही एक मूलभूत गरज बनली आहे. तथापि यातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे घेतलेले विम्याचे कवच योग्य रकमेचे आणि पुरेसे आहे काय? जर कुटुंब आरोग्य विमा योजना विचारात घेतली गेली असेल तर एकूण विमाकवचाचे विभाजन इतर कुटुंबीयांमध्ये होईल हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे अशाप्रकारचे विमाकवच मोठय़ा रकमेचे असावे. वर्षभरात एकापेक्षा अधिक वेळा रुग्णालयात भरती व्हावे लागेल ही शक्यता दुर्लक्षून चालणार नाही. यावर उपाय म्हणजे मूलभूत आरोग्य विमा पॉलिसीवर टॉप-अप कव्हरची निवड करता येईल. तुमचे मूलभूत विमाकवच छोटय़ा आजारांचा खर्च उचलायला पुरेसे ठरेल. मात्र, एखादी मोठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास हे कवच अपुरे ठरेल. अशावेळी टॉप-अप कव्हर पर्याय जीवरक्षक ठरतो. यामध्ये कमी खर्चात मोठय़ा विमाकवचाची हमी राहते.

आरोग्य विम्यासंबंधी लक्षात घेण्याजोगे मुद्दे:

special provisions in constitution of india for sc st and obc
संविधानभान : सामाजिक न्यायाची गुंतागुंत
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
  • वैद्यकीय आपत्कालीन स्थिती ही गंभीरच असते. आजार उसळून येण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देत नसतात. सध्याच्या धकाधकीत व्यावसायिक आणि व्यक्ती अत्यंत तणावाचे जीवन जगत असतात. त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या आणि जीवनशैलीशी निगडित आजार उद्भवतात. म्हणूनच आरोग्य विम्याची सोय जितक्या लवकर करता, तितके चांगले!
  • एखादी गंभीर परिस्थिती उद्भवण्यापूर्वी आरोग्य विमाकवच घेतलेले बरे, अन्यथा वैद्यकीय खर्चापायी तुमची सगळी बचत संपू शकते. तरुण कुटुंबांनी फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा घ्यावा. त्यात सर्वसामान्यपणे मुलांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत विमाकवचाचा लाभ मिळतो.
  • वैद्यकीय खर्च केवळ रुग्णालयातील भरतीपुरता मर्यादित नसतो. त्यामध्ये प्रवास, राहणे-खाणे, रुग्णालयात भरती झाल्याने तात्पुरते गमावले जाणारे उत्पन्न असे सर्व अप्रत्यक्ष खर्च त्यात समाविष्ट असतात. आरोग्य विमाकवच तपासून पाहावे आणि अशा पद्धतीचे आकस्मिक वैद्यकीय खर्च निर्माण झाल्यास कशाप्रकारचे साहाय्य मिळेल याचा विचार करावा.
  • एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागल्यास तुम्हाला मदतीचा ठरेल अशा विम्याची निवड करावी. काही आरोग्य विमा योजनांमध्ये जीवनशैलीविषयक आजार उदाहरणार्थ, कर्करोग आणि तत्सम गंभीर आजार समाविष्ट असतात. अशाप्रकारच्या आजाराचे निदान झाल्यास या पॉलिसी सामान्यपणे एकदाच एकरकमी मदत पुरवतात. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना गरजेच्यावेळी मोठी मदत मिळते.
  • तुमचे म्हातारपण आणि निवृत्तीचे नियोजन करा. नियोक्त्या कंपनीने/ मालकाने तुमचा आरोग्य विमा काढला असल्यास एखादी वैयक्तिक किंवा कौटुंबिक विमा योजना खरेदी करा. कारण एकदा कर्मचारी निवृत्त झाला की, त्याला कशाचेच कवच मिळत नसते. वय झाल्याने बाजारात पॉलिसीदेखील उपलब्ध नसते. तसेच एखादप्रसंगी नोकरी बदलतेवेळी, जुन्या आणि नवीन नोकरी दरम्यानच्या काळात तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचे विमाकवच नसते.

आरोग्य विमा आवश्यक आहे; याकडे एखाद्याने आरोग्यविषयक गुंतवणूक म्हणून पाहण्याची गरज आहे. आपल्याला याची कधीच आवश्यकता भासणार नाही असा विचार तुम्ही कदाचित कराल, मात्र गरज लागण्यापूर्वी तजवीज करण्यात हयगय करू नका. आजच सुरुवात केलीत तर विम्याच्या हप्त्यांचा भारही फार नसेल. उद्या उद्भवणाऱ्या मोठय़ा आर्थिक खर्चासाठी आजच बचत करा. तंदुरुस्त राहा आणि सुरक्षितही राहा! तुम्ही कदाचित स्वत:ला सर्व आजारांपासून वाचवू शकणार नाही, मात्र योग्य विमा योजना निवडून आर्थिक त्रास नक्कीच कमी करता येईल.

रुपम अस्थाना

(लेखक लिबर्टी व्हीडियोकॉन जनरल इन्श्युरन्स कंपनीचे मुख्याधिकारी आणि पूर्णवेळ संचालक)