07 July 2020

News Flash

रिझव्‍‌र्ह बँकेचा बदलता रोख आशादायक दसरा झाला. आता दिवाळीचे वेध.

जानेवारी २०१५ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या पत धोरणात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे.

गुंतवणूक फराळ भाग :  एक
संजय डोंगरे, वरिष्ठ निधी व्यवस्थापक, युटीआय म्युच्युअल फंड
विनीत सांबारे, डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड
दिवाळी म्हटले की लक्ष्मीपूजन आणि आर्थिक बाब म्हणून त्या जोडीने येणारा शेअर बाजारही आलाच. म्हणूनच ‘लोकसत्ता-अर्थसत्ता’च्या वाचकांसाठी हा गुंतवणूक फराळ. पुढील दोन मंगळवारीही तो देण्यात येईल. तेव्हा या पहिल्या भागात म्युच्युअल फंड व्यवस्थापक हे पुढील वर्षभराच्या बाजाराच्या वाटचालीबाबत आपली मते मांडत आहेत
रिझव्‍‌र्ह बँकेचा बदलता रोख आशादायक
जानेवारी २०१५ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या पत धोरणात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. गेली चार वष्रे चढा राहिलेला महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेला अपेक्षित असलेल्या पातळीवर महागाईचा दर स्थिरावत असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने मागील चार वष्रे चढा राखलेला व्याजदर कमी  करून धोरण बदल केला आहे. साहजिकच याचा फायदा आíथक आवर्तनावर अवलंबून असणारया उद्योग क्षेत्रांना होणार आहे. यात प्रामुख्याने बँका, वाहन उद्योग व वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या, भांडवली वस्तू, बांधकाम व पर्यायाने सिमेंट या सारख्या उद्योगांना होईल. पुढील एका वर्षांचा विचार करता वरील उद्योग बदलत्या पतधोरणाचे लाभार्थी असतील. कुठल्याही पोर्टफोलिओत चांगला वृद्धीदर राखणाऱ्या कंपन्यांच्या जोडीला गुंतवणुकीला स्थर्य देणारी सुरक्षित उद्योग क्षेत्रातील कंपन्या असणे जरुरीचे असते. अपेक्षित असलेली अमेरिकेतील व्याजदरवाढ लक्षात घेऊन रुपयाचे अवमूल्यन होण्याची शक्यता वाटते. माहिती तंत्रज्ञान व औषध निर्माण उद्योगातील आमच्या गुंतवणुकीत रुपयाच्या अवमुल्यानाच्या लाभार्थी ठरणार असल्याने गुंतवणुकीत ‘संरक्षित उद्योगांची’ भूमिका बजावतील. तेल आदी जिन्नसांच्या घसरलेल्या किंमतींचा भारत हा लाभार्थी ठरणार आहे. याचा परिणाम पुढील एका वर्षांत भारताला अव्वल वित्तीय परिणामे प्राप्त होतील. देशातील करसंकलनाचे आकडे मागील दोन वर्षांतील सर्वात चांगला वृद्धीदर दर्शवणारे आहेत. देशाची चालू खात्यावरील तुट नियंत्रणात आल्याने व सरकारचा दृष्टीकोन पायाभूत सुविधा उभारण्याकडे आहे. आमचा रोख हा धोरणात्मक महत्वाच्या उद्योगात गुंतवणूक करवर राहील. मागील बारा महिन्यात मिड-कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या योजनांनी अव्वल परतावा दिला कमी झालेल्या जिन्नसांच्या किंमती व कमी होणारे व्याजदर लक्षात घेऊन पुढील १२ ते १८ महिन्यांचा विचार करता गुंतवणूकदारांना लार्ज-कॅप प्रकारच्या योजना चांगला परातावा देणे अपेक्षित आहे. या कंपन्यांचा आíथक वर्ष २०१६-२०१७ मधील नफ्यात १५ ते १७ टक्के वृद्धी होणे अपेक्षित आहे. बदलत्या आíथक आवर्तनाचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी लार्ज-कॅप योजनांचा विचार नक्कीच करावा.

नवीन वर्षांत निर्देशांकाकडून नवीन शिखराची अपेक्षा
भारतीय शेअर बाजार हा परकीय गुंतवणूकदारांचे कायमच आकर्षण राहिलेला असून आगामी १२ महिन्यांचा विचार करता तो त्यांना अधिकच आकर्षक वाटेल. याचे कारण एका वर्षांपूर्वी शंभर डॉलर प्रति िपप असलेले कच्च्या तेलाचे भाव आता ५० डॉलर प्रतििपप या पातळीवर आलेले आहेत.
भारत हा इंधनाचा मोठा आयातदार असल्याने देशाच्या इंधन खर्चाची मोठी बचत होणार आहे. कमी झालेल्या वित्तीय तुटीमुळे सरकारचा रोख अनुदानांकडून पायाभूत सुविधांच्या विकासाकडे असणार आहे. २०१४ मध्ये बाजाराचा प्रवास हा एकाचा दिशेला झाला २०१५ मध्ये बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सर्व कालीन शिखराला जरी स्पर्श केला असला तरी तिथून बाजाराच्या निर्देशांकांचा कल या पातळीवरून खालच्या दिशेला वळला. इथून बाजार नव्या जोमाने पुन्हा एकदा नवीन वर्षांत सर्वोच्च पातळी गाठण्यास सिद्ध झालेला आहे.
भारतीय शेअर बाजारात नोंदल्या गेलेल्या कंपन्यांची संख्या खूप मोठी आहे. या सर्व कंपन्यांच्या नफ्यावर बदलत्या आíथक आवर्तनाचा परिणाम होणे क्रमप्राप्त आहे.
आम्हाला असे वाटते की, जेव्हा बाजारात सर्वसमावेशक तेजी परतत असताना या तेजीचे लाभार्थी मिड-कॅप व मायक्रो-कॅप प्रकारचे समभाग असतील. आदर्श व्यवस्थापन असणारया अनेक कंपन्या आमच्या गुंतवणुकीच्या परिघात आहेत. बदलत्या गुंतवणूक आवर्तनाच्या लाभार्थी असलेल्या या कंपन्या आमच्या गुंतवणुकीत आहेत. या पकी औषध निर्माण, बांधकाम, यंत्रसामुग्री माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रावर आमचा पुढील वर्षांचा विचार करता भर राहील. गुंतवणूकदारांसाठी सांगायचे तर, त्रांनी आपल्या जोखीम सहन करण्याच्या इच्छेनुसार फंडाची निवड करून बदलत्या परिस्थितीचा लाभ घेणे श्रेयस्कर ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2015 7:52 am

Web Title: investment guidence part one
टॅग Investment
Next Stories
1 वायदा बाजारात व्यापाऱ्यांची डाळ ‘शिजण्याची’ नियामकाला भीती
2 सेन्सेक्सची शतकी घसरण
3 टाटा हाऊसिंगची ‘फेसबुक’वर घर विक्री
Just Now!
X