News Flash

महिंद्रची वाहने महागली

एसयुव्ही निर्मितीतील महिंद्र समूहाने सर्व वाहनांच्या किंमती अध्र्या टक्क्याने तातडीने वाढविण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. दरवाढीला समूहाच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी प्रविण शाह यांनी

| July 2, 2013 12:02 pm

एसयुव्ही निर्मितीतील महिंद्र समूहाने सर्व वाहनांच्या किंमती अध्र्या टक्क्याने तातडीने वाढविण्यात येत असल्याचे घोषित केले आहे. दरवाढीला समूहाच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी प्रविण शाह यांनी डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाचे कारण दिले आहे. यामुळे वाहनांच्या किंमती ३,००० ते ६,००० रुपयांनी वधारणार आहेत. महागडी एक्सयुव्ही५०० व रेक्सटॉन यांना मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. एक्सयुव्ही५०० ही कंपनीची आलिशान एसयुव्ही श्रेणीतील लोकप्रिय वाहन असून तिच्या पदार्पणातच प्रचंड प्रतिसाद लाभला होता. तर रेक्सटॉन हे महागडय़ा एस्युव्ही वाहन श्रेणीतील वाहन समूहाने कोरियन कंपनी त्याब्यात घेतल्यानंतर सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 12:02 pm

Web Title: mahindra raises prices for some vehicles by 0 5 percent
टॅग : Business News,Mahindra
Next Stories
1 हीरोच्या बाईक ३० हजाराच्या आत?
2 टोनी-टाटांचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज
3 सरकारने वायूदर वाढीची धमक दाखविली
Just Now!
X