४० टक्के बाजारहिस्सा; ५० लाख वाहनांची विक्री
देशातील सर्वात मोठी कारनिर्मात्री कंपनी मारुती सुझुकीने ग्रामीण भागात ५० लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भारतात १,७०० विक्री दालने पसरलेल्या या कंपनीचा या बाजारात ४० टक्के हिस्सेदारी राहिली आहे. विक्रीबाबत पहिल्या दहामध्ये मारुतीच्या सात ते आठ कारचा समावेश असतो.

भांडवली बाजारात सूचिबद्ध मारुती सुझुकीने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १४.५७ लाख प्रवासी वाहने विकली. वित्त वर्ष २०१९-२० मधील १५.६३ लाख वाहनांच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील एकूण वाहन विक्री ३.५३ लाख राहिली आहे.

मारुती सुझुकीच्या विक्री विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणासे की, कंपनीच्या स्थानिक विक्रेत्यांच्या पाठबळावरच ग्रामीण भागातील ५० लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठता आला आहे.