सहकार क्षेत्रातील आघाडीच्या अपना बँकेच्या सभासदांना मुंबईतील शुश्रूषा रुग्णालयात सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी याबाबतची घोषणा अपना बँकेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. याबाबत उभयतांमध्ये सामंजस्य झाले असल्याचे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नंदू लाड यांनीही सांगितले. बँकेचे ४६ हजारांहून अधिक सभासदांना याचा लाभ होईल.