‘म्हाडा’च्या मुंबईतील ९७२ घरांच्या सोडतीसाठी आतुरतेने वाट बघणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. म्हाडाकडून सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, इच्छुकांना २३ जून ते २३ जुलै या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २४ जून ते २४ जुलै अशी असणार आहे, तर बँकेत डीडी भरण्याचा कालावधी २४ जून ते २७ जुलै असा असेल. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे ‘म्हाडा’ने जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. सोडतीच्या ९७२ घरांमध्ये सर्वात स्वस्त घरं हे अत्यल्प उत्पन्न गटासाठी मालवणी (मालाड) येथे ८ लाख १७ हजार रुपये इतक्या किमतीचे असणार आहे, तर सर्वात महागडे घर उच्च उत्पन्न गटासाठी शैलेंद्र नगर (दहिसर) येथे ८३ लाख ८६ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

घरे कुठे?
सायन, प्रतीक्षानगर, मानखुर्द, मुलुंड, सायन, पवई, बोरिवली, शिंपोली, गोरेगाव, वर्सोवा, दहिसर, चांदिवली येथे ही घरे असून यात उच्च उत्पन्न गटांच्याही घरांचा समावेश आहे. तसेच, यातील काही घरे ही जुनी असून काही नवीन तर मुख्यमंत्री कोटय़ातील काही घरांचा यात समावेश आहे.