News Flash

मिडकॅपचा बहर सुखावणारा

चालू सप्ताहाची अखेर सर्वाच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या निकालाने झाली. निकालाचा दिवस म्हणजे या समभागासाठी

| January 11, 2014 12:29 pm

चालू सप्ताहाची अखेर सर्वाच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या निकालाने झाली. निकालाचा दिवस म्हणजे या समभागासाठी नाटय़मय चढउताराचा गेली दोनेक वर्षे दिसून आला आहे. पण यंदाच नव्हे तर सलग तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसने या जवळपास नियम बनलेल्या प्रघाताला फाटा दिला. निकालाआधी गुरुवारी इन्फोसिससह सर्वच आयटी समभागांनी दाखविलेली तेजी बाजाराची उत्सुकता स्पष्ट करणारी होती.
आयटीव्यतिरिक्त फार्मा कंपन्यांचे शेअर्समधील तेजीचा प्रवाह अखंडपणे सुरूच आहे. डॉ. रेड्डीजची एकमार्गी भावसरशी सुस्पष्टच आहे, तर त्या खालोखाल कॅडिला हेल्थकेअरची मार्गक्रमणा सुरू आहे.
इन्फोसिसद्वारे सुरू झालेला निकालाच्या हंगामात, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल लक्षवेधी ठरावेत. विश्लेषकांच्या मते सरलेल्या तिमाहीत या कंपन्यांचा नफा निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. मुंबई, दिल्ली, एनसीआर या प्रमुख बाजारपेठांमधील प्रतिकूल विक्रीचे अंदाज यामागे निश्चितच आहेत. बंगळुरू, पुण्यातदेखील विक्रीचा कल असाच मंदावलेला आहे. तरी या क्षेत्रातील ‘मूल्यात्मक खरेदी’पायी बीएसई रिअ‍ॅल्टी इंडेक्सची कामगिरी ही सेन्सेक्सलाही पिछाडीवर टाकणारी आहे.
नववर्षांच्या पहिल्या सप्ताहात बाजाराच्या सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकाचा कल निरुत्साही असला तरी स्मॉल-मिडकॅपमधील बहर सुखावणारा निश्चितच आहे. स्मॉल व मिडकॅपकडे वाढलेले आकर्षण या नवप्रवाहाबद्दल या स्तंभात नववर्षांच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. पण बऱ्याच दिवसांनंतर या समभागांमध्ये नफा कमावण्यासाठी विक्रीही दिसून आली आणि ती अत्यंत स्वाभाविक गोष्टही आहे. तरी अनेक समभाग असे आहेत, ज्यात निरंतर तेजी सर्किट दर  सुरूच आहे. मोठय़ा कालांतरानंतर चांगला भाव मिळालेल्या या समभागातून कुणी बाहेर पडत असेल अथवा काही नफा पदरी बांधून घेत असेल तर तो सुज्ञपणाच म्हणायला हवा. विशेषत: मध्यम आकाराच्या सरकारी बँकांसाठी ही बाब कटाक्षाने लागू केली जायला हवी. विदेशी वित्तसंस्था (एफआयआय)चा मिडकॅपसदृश बदललेला गुंतवणूक पॅटर्न त्यातच याच आठवडय़ात कैक समभागांच्या सर्किट मर्यादेतील फेरबदल हे छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पथ्यावरच पडणारे आहेत. बीएसईवरील ४०७ समभागांबाबत हा निर्णय झाला. पण यातील १९८ शेअर्सची सर्किट हे ५ टक्क्यांवरून २० टक्केकरण्यात आले, हे विशेष.  
बाजार गप्पा..
‘एनएसईएल’ या उपकंपनीतील घोटाळ्यांनी ग्रासलेल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीज् या प्रवर्तक कंपनीला संपादित करण्यासाठी याआधीचा घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटरच्या अधिग्रहणाचा अनुभव गाठीशी असलेल्या टेक महिंद्रने प्रयत्न सुरू केले असल्याची वदंता आहे. तर याच समूहातील अग्रणी वस्तू वायदा बाजाराची चालक ‘एमसीएक्स लि.’ ही कंपनी सरकारसमर्थित युनिव्हर्सल कमॉडिटी एक्स्चेंज (यूसीएक्स)कडून अधिग्रहित केली जाईल, या चर्चेला जोर चढला आहे. नवे प्रवर्तक लाभणार या आशेने एमसीएक्स आणि फायनान्शियल टेक्नॉलॉजीज दोन्हींचा भाव आठवडय़ाभरात अनुक्रमे ८% आणि ४०% वधारला मात्र आहे.
शिफार स
गेल्या आठवडय़ात सुचविलेल्या ब्रुक्स लॅबॉरेटरीज्ने (बीएसई भाव : २०.४०) अपेक्षेप्रमाणे सप्ताहारंभीच २० टक्क्यांचे वरचे सर्किट गाठले. पण सप्ताहअखेर आहे त्याच भावावर तो पुन्हा स्थिरावला. सध्या कॅपलिन पॉइंट लॅबॉरेटरीज लि. (बीएसई भाव : १३३.१०)मधील उलाढाल लक्षणीय वधारली आहे. शुक्रवारी १०% घसरण दाखविली असली तरी मध्यम कालावधीत हा समभाग त्याचा वार्षिक उच्चांक १६०चा भाव दाखवू शकेल. मात्र स्मॉलकॅप शेअर्स वादळी वध-घटीचेही असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 12:29 pm

Web Title: mid cap of the week
Next Stories
1 गुडविन ज्वेलर्सचे मुंबईत पाच दालनांचे लक्ष्य
2 घसरणीचा दशकातील उच्चांक
3 सोने तारण कंपन्यांना रिझव्‍‌र्ह बँकेचा उपहार
Just Now!
X