आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा प्रति पिंप ३० डॉलरकडे वाटचाल करू लागले आहेत. युरोपच्या मध्यवर्ती बँकेने बिकट अर्थस्थितीचा सामना करणाऱ्या युरोझोनकरिता आर्थिक सहकार्याचे सुतोवाच केल्यानंतर खनिज तेल ३० डॉलरनजीक व्यवहार करू लागले.
लंडनच्या बाजारात ब्रेंट तेलाचे पिंपामागे २९.३८ डॉलरचे व्यवहार होत होते. यामुळे खनिज तेलाने गेल्या जवळपास दोन वर्षांचा तळ नोंदविला होता.
सलग तीन आठवडय़ातील घसरणीने तर तेल दरात तब्बल ७५ टक्क्य़ांची घसरण झाली होती. मे २०१४ पासून सातत्याने घसरत असलेल्या तेल दरांचा स्तर जून २०१६ पासून खालच्या दरपातळीवर आणखी विस्तारला.