‘ओरिओ’नंतर आता ‘कॅडबरी बोर्नव्हिटा’ नाममुद्रा विकसित
तब्बल पाच वर्षांनंतर कॅडबरी नाममुद्रेची मालकी असलेल्या मॉन्डेलीझने पुन्हा एकदा बिस्किट निर्मितीत शिरकाव केला आहे. ‘ओरिओ’द्वारे या क्षेत्रात यशस्वी स्थान मिळविल्यानंतर मॉन्डेलीझने तिच्या ‘बॉन्र्हिटा’ या अन्य नाममुद्रेद्वारे नवे बिस्किट सादर केले आहे.
कॅडबरीच्या ताफ्यातील हे दुसरे बिस्किट उत्पादन आहे. त्याची किंमत १० व २५ रुपये आहे.
मॉन्डेलीझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने मंगळवारी आपल्या ‘कॅडबरी बोर्नव्हिटा’ बिस्किटच्या नवीन बिस्किट नाममुद्रेच्या भारतातील अनावरणाची घोषणा केली. ग्राहकांचा सखोल अभ्यास आणि माल्टेड पेय बोर्नव्हिटाच्या माध्यमातून हे नवीन बिस्किट विशेषत: निमशहरी व ग्रामीण भागावर लक्ष ठेवून तयार करण्यात आले आहे.
येत्या १ मे पासून ते बाजारात उपलब्ध असेल.
बोर्नव्हिटा बिस्किट्स हा कंपनीचा ओरिओनंतरची बिस्किटांच्या वर्गातील दुसरी नाममुद्रा असून ओरिओ यापूर्वी २०११ मध्ये बाजारात दाखल झाले होते. नव्या उत्पादनाबरोबर मॉन्डेलीझ इंडियाने आपले या क्षेत्रातील अस्तित्व क्रीम ते कुकीजपर्यंत विस्तारित केले आहे. बोर्नव्हिटा बिस्किटे प्रोहेल्थ व्हिटॅमिन आणि चॉकलेटी चवीसह सादर केल ेआहे.
मॉन्डेलीझ इंडिया फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रमौली वेंकटेशन म्हणाले की, मॉन्डेलीझ इंटरनॅशनल ही जगातील आघाडीची बिस्कीट कंपनी आहे आणि भारत हा आमच्यासाठी सर्वाधिक प्राधान्याचा देश आहे. भारतीय बिस्किट विभागात वाढीसाठी खूप मोठय़ा संधी आहेत. बोर्नव्हिटा बिस्किट जागतिक वर्गातील ज्ञान आणि नावीन्यपूर्णता यांच्यातील सर्वोत्तम एकत्र आणून स्थानिक ज्ञान आणि अनुभवाशी जोडते. यामुळे भारतातील बिस्किट विभागातील आमचे स्थान आणखी मजबूत होईल.
कंपनीच्या विपणन विभागाचे सहयोगी संचालक चेलल पांड्यन यांनी सांगितले की, कॅडबरी बोर्नव्हिटाने भारतीय ग्राहकांमध्ये गेली सात दशके वरचे स्थान मिळविले आहे.