News Flash

आठवडय़ाची मुलाखत : संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत निश्चितच अधिक परतावा देऊ

आज म्युच्युअल फंडांचा व्यवसाय हा भारतातील १५ शहरांपुरता (टी—१५) मर्यादित आहे.

वाहन निर्मितीतील, विशेषत: एसयूव्ही गटात अव्वल असलेल्या महिंद्र समूहानेही आता म्युच्युअल फंड व्यवसाय क्षेत्रात शिरकाव केला आहे. देशातील ४० हून अधिक फंड व्यावसायिकांमध्ये स्थिरावण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित योजना सादर करतानाच महिंद्र म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिष्णोई यांनी अधिक परताव्याचे वचनही दिले आहे

  • तुमचे प्रवर्तक असलेल्या महिंद्रा फायनान्सने मालमत्ता व्यवस्थापन (म्युच्युअल फंड) व्यवसायात पदार्पण करण्याचा का निर्णय घेतला?

आज भारतातील ६०% जनता खेडय़ात राहात आहे. ही लोकसंख्या आमचे प्रवर्तक असलेल्या महिंद्र फायनान्सची ग्राहक आहे. आमचे प्रवर्तक गृहकर्ज, वाहन कर्ज व अन्य विमा उत्पादने या सारख्या आर्थिक सेवांच्याद्वारे आमच्याशी जोडली गेली आहे. आज या ग्राहकांच्या गुंतवणूकविषयक गरजांची पूर्ती होताना दिसत नाही.

साहजिकच ही मंडळी गुंतवणुकीसाठी सोने जीवन विमा मुदत ठेवी या सारख्या पारंपारिक भौतिक साधनांचा वापर आपल्या गुंतवणूकविषयक गरजांची पूर्ती करण्यासाठी वापर करीत आहेत. आमच्या मते, ग्रामीण भारतातील गुंतवणुकदार ही मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतील प्रवेश करण्याची  गरज निर्माण झाल्याने आमच्या प्रवर्तकांना या व्यवसायात पदार्पण करावेसे वाटले.

 

  • भारतातील १५ लाख कोटींच्या मालमत्ता व्यवस्थापनाच्या बाजारपेठेत नव्याने पदार्पण करणाऱ्यात तुमचा ४३ वा Rमांक आहे. शहरांपूर्ती मर्यादित असलेल्या या बाजारपेठेत तुमची भूमिका काय आहे?

आमचे प्रवर्तक महिंद्रा फायनांस ही आर्थिक सेवा व कर्ज वितरण व्यासायातील एक यशस्वी कंपनी असून ग्रामीण भारतात ज्या खेडय़ात राष्ट्रीयकृत बँकासुद्धा पोहचलेल्या नाहीत तिथपर्यंत शाखा व  विक्री प्रतिनिधीचे जाळे असलेली यशस्वी कंपनी आहे. आज ग्रामीण विक्री तंत्रात आम्ही आमच्या अनुभवाने काही गोष्टी शिकलो आहोत. आज म्युच्युअल फंडांचा व्यवसाय हा भारतातील १५ शहरांपुरता (टी—१५) मर्यादित आहे.

आमच्या आधी या व्यवसायात पदार्पण केलेल्या कंपन्यांच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा भारतातील १५ शहरांतूनयेत असल्याने व आमच्या प्रवर्तकांचे विक्री जाळे संपूर्ण भारतात पसरलेले असल्याने आमचे धोरण ग्रामीण भारतात म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे साधन पोहचविण्याचे आहे. ज्या ज्या शहरात किंवा जिल्ह्यच्या ठिकाणी महिद्रा फायनांसशी शाखा आहे त्या त्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी असेल व तो हे उत्पादन गुंतवणूकदारांपर्यंत घेऊन जाईल. पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आम्ही मोठय़ा प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार तो साल्लागारांमार्फात योग्य उत्पादनाची निवड करू शकेल.

 

  • इतक्या मोठय़ा संख्येने असलेल्या गुंतवणूकदारापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात?

आम्हाला इतक्या मोठय़ा संख्येने असलेल्या ग्राहकापर्यंत पोहोचायचे असेल तर आमची संवादाची भाषा सामान्य जनता ज्या  भाषेत बोलते ती भाषा ठेवावी लागेल. आमच्या उत्पादनाची नावे सामान्य जनतेला समाजातील अशी असतील. सध्या प्राथमिक विक्री सुरू असलेल्या आमच्या योजनेचे ‘महिंद्रा कर बचत योजना’ हे असून या नावातून योजनेचा उद्देश सामान्य गुंतवणूकदाराला समजेल असा आहे.

भविष्यात येऊ  घातलेल्या आमच्या योजनांची नावेसुद्धा महिंद्र महिंद्र बालविकास योजना, महिंद्र बचत योजना (रोखे गुंतवणूक करणारी) असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या गुंतवणूकदाराला त्याच्या गरजांची पूर्तता करणारी योजना निवडणे सोपे जाईल.

 

  • तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरवात कर बचत योजनेनेच करण्यामागचा काय उद्देश आहे?

कोणत्याही फंड घराण्याच्या ‘डायव्हार्सीफाईड इक्विटी’ फंडापेक्षा ‘इएलएसएस’ फंडाचा परतावा अधिक असतो. कारण या योजनेत गुंताविलेला निधी त्या योजनेत किमान ३ वर्ष असतो. या मुळे जोखमीचे व रोकड सुलभतेचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. याच भूमिकेतून आमच्या व्यवसायाची सुरवात आम्ही ‘इएलएसएस’ अर्थात कर वजावटीसाठी ग्रा असणाऱ्या योजनेने करायचे ठरविले.

आमच्या गुंतवणुकीच्या परिघात २०० समभाग असून या प्रत्येक समभागाच्या शेअर बाजारात व्यवहाराला सुरवात झाल्यापासूनची आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. या आकडेवारीच्या आधारे, प्रत्येक समाभागाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा मार्ग आम्हाला ज्ञात असून निफ्टी २०० हा या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा निष्टिद्धr(१५५)तच अधिक परतावा ३ वर्षांत देऊ अशी, आम्ही आशा बाळगत असल्याने आम्ही आमच्या योजनांची सुरवात करबचत योजनेने करण्याचे ठरविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 4:01 am

Web Title: mutual fund 2
Next Stories
1 म्युच्युअल फंड खाती पाच कोटींवर; ऑगस्टअखेर २१ लाखांची भर
2 महागाई पाच टक्क्य़ांवर
3 फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे संकेत; सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण
Just Now!
X