कोणत्याही गोष्टीचे प्रमाण जास्त असणे हे बरेचदा आनंददायी आणि रोमांचक वाटू शकते. परंतु आपल्याला ‘अति तिथे माती’ ही म्हणदेखील माहिती आहे. म्युच्युअल फंडच्या बाबतीतदेखील गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड घराणे अशा दोघांसाठीही कमीत कमी योजना या निर्णय घेण्याच्या आणि सांभाळण्याच्या दृष्टीने सोयीच्या असतात.

१. निवडीतील विरोधाभास

विविध ४३ म्युच्युअल फंड कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या २,००० हून अधिक निधी योजनांमधून सर्वात योग्य पर्याय निवडणे हे नव्या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सोपे काम नाही. विविध योजना बघून गुंतवणूकदारदेखील गोंधळात पडतो आणि एखादा निर्णय घेतल्यावरदेखील त्याच्या मनात संभ्रम कायम राहतो. अशा प्रकारचा निर्णय घेतल्यावर जर त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला लाभ मिळाला नाही तर भविष्यात कोणतीही गुंतवणूक करण्यास तो धजावत नाही.

२. लक्ष केंद्रित करणे

जर तुमच्याकडे कमी योजना असतील तर त्यातून निवड करणे हे तुलनेने कमी त्रासदायक असते. विविध पर्यायांची स्पष्टपणे मांडणी केली असेल तर अशा गोष्टी मनावर छाप पडतात. म्युच्युअल फंड निवडताना त्याचा मूळ उद्देश हा दोन फंडमधील फरक लक्षात घेणे असता कामा नये. तुमच्या आर्थिक उद्देशाच्या तो किती जवळपास जाणारा आहे, त्यातील धोक्यांची शक्यता आणि गुंतवणूकक्षमता या बाबी लक्षात घेणे जास्त जरुरीचे असते.

३. बाजाराला हरविणे कठीण

अती विविधता तुमच्या समभाग पोर्टफोलिओसाठी त्रासाची होऊ  शकते. जो गुंतवणूकदार ३०० वैशिष्टय़पूर्ण रोखे (स्टॉक्स)च्या बरोबरीने असणाऱ्या  ८ ते १० म्युच्युअल फंड योजनांची निवड करतो त्यावर बाजाराच्या ८८% ची देणी देण्याची वेळ येते. तुमच्या आर्थिक उद्देशांच्या पूर्ततेसाठी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या उपलब्ध असणाऱ्या विविध योजनांमध्ये योग्यरीतीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एकाचप्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर मात्र संपत्ती मिळविण्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणताही विशेष लाभ होणार नाही. २० ते २५ रोख्यांपेक्षा जास्त नसणाऱ्या प्रत्येक श्रेणीतील एका योजनेत गुंतवणूककरण्यामुळे समभाग पोर्टफोलिओमध्ये एकाच प्रकारच्या योजनांचा समावेश टाळता येतो आणि योग्य गुंतवणूक तसेच विविधता प्राप्त करण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे.

४. एक पातळी निश्चित करा

एकाच प्रकारच्या योजनांविषयी कायद्यात असे नमूद करण्यात आले आहे की, म्युच्युअल फंड कंपन्या ज्या योजना देऊ  करतात फंडांच्या संख्येत एकत्रीकरण आणि सुसूत्रता यावी यासाठी प्रत्येक श्रेणीत एकच योजना असावी. गुंतवणूकदार, मध्यस्थ आणि फंड कंपन्यांसाठी ही श्रेणी आणि योजनांसाठीची ही स्पष्ट आणि ठोस व्याख्या आहे. उदा. दोन लार्ज कॅप फंड आहेत जे दोन्हींनी दोन वेगळ्या कंपन्यांकडून दिले जात आहेत. एका योजनेत मोठय़ा ब्ल्यू—चीप कंपन्या आहेत तर दुसऱ्यात ब्ल्यू—चीप आणि उदयोन्मुख रोखे यांचा एकत्रित समावेश आहे. दोन कंपन्याच्या तुलनेत एक चूक अशी की, दोन्ही फंड हे लार्ज कॅप श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत; परंतु वास्तवात ते दोन्ही भांडवली रोखे (लार्ज—कॅप स्टॉक्स) नाहीत.

५. प्रमाण रुपांवर मात करा

जेव्हा फंड कंपन्यांमध्ये काही व्यावहारिक योजना योग्य गुंतवणूक विश्वात प्रतिबिंबित होतात तेव्हा फंडाची वर्गवारी करताना म्युच्युअल फंड हाऊससाठी वरदान ठरते.

उदाहरणार्थ, शाळेचे आदर्श शिक्षक—विद्यार्थी गुणोत्तर १:२० असे असते. म्युच्युअल फंड कंपन्यांकडून असेच प्रमाण अपेक्षित आहेत. प्रत्येक योजनेमागे एक निधी व्यवस्थापक योग्य ठरतो. ज्यामुळे संशोधक विश्लेषक एकाच पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करून कामगिरी पाहू शकतो.

फंडांची कामगिरी चांगली राहण्यासाठी प्रमाण रुपांवर मात करण्याच्या दृष्टीने तसेच महत्त्वपूर्ण परतावा देण्यासाठी हे आवश्यक असते.

(लेखक मोतीलाल ओसवाल एएमसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (निधी व्यवस्थापक) आहेत.)