मुंबई : क्षेत्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडांपैकी निप्पॉन इंडिया फार्मा फंड हा ५,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा गाठणारा पहिला फंड ठरला आहे. मेअखेरच्या मालमत्तांच्या ताज्या आकडेवारीत हे स्पष्ट झाले आहे.

औषधनिर्मिती, आरोग्यनिगा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या फंड मालमत्तेत ३१ मार्च २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत फंड मालमत्तेत १३९ टक्के वृद्धी झाली असून फंडाच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीमध्ये १०४ टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी ३,२०० ते ३,३०० कोटी रुपये फार्मा फंडात गुंतविले असून या गुंतवणुकीपैकी २२ टक्के गुंतवणूक निप्पॉन इंडिया फार्मा फंडात झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

संपत्ती निर्मितीसाठी निप्पॉन इंडिया फार्मा फंड हा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आल्याचे मानले जात आहे. याचा परिणाम म्हणून हा फंड गुंतवणूकदार आणि फंड वितरक यांनी वैश्विक महासाथीची सुरुवात झाल्यापासून आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणूकदारांची रुची दिसून आली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत औषध उत्पादक कंपन्या नसून उद्योगाच्या बदलत्या रचनेनुसार, आरोग्यनिगा क्षेत्राशी नव्या कंपन्यांच्या सूचिबद्धतेमुळे या क्षेत्रातील रुग्णालये, निदानपूर्व चाचण्या, आरोग्य विमा इत्यादी नव्या आरोग्यनिगा क्षेत्राशी संमंधित कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत झाला. फंडाची ८५ टक्के गुंतवणूक आरोग्य निगा आणि औषधनिर्मिती क्षेत्रात, तर १५ टक्के गुंतवणूक आरोग्य निगा सेवा क्षेत्रात आहे. करोनापश्चात औषधनिर्माण कंपन्यांमध्ये सुरू झालेल्या तेजीत आश्वासक कामगिरी केलेल्या या फंडाने गेल्या वर्षात ६६.२१ टक्के परतावा दिला आहे.