मोठय़ा प्रमाणात ग्राहकावर्गापर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून श्रीराम ऑटोमॉलने आपली कॉर्पोरेट संकेतस्थळ (www.samil.in) दाखल केले आहे. हे संकेतस्थळ म्हणजे कंपनीचे ऑनलाइन सेवादालन असून, त्यायोगे ग्राहकांना प्री-ओन्ड (जुनी-वापरलेली) वाहने, त्यांचा उपलब्ध वर्गवारीसह साठा, किमती व आणि ठिकाणांचा माहिती मिळेल. तत्पर ग्राहक सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता ही महत्त्वपूर्ण व्यवसाय मूल्येच या नव्या सेवादालनातून प्रतिबिंबीत होतील असे या संकेतस्थळाच्या अनावरणाप्रसंगी श्रीराम ऑटोमॉल इंडियाचे मुख्याधिकारी समीर मल्होत्रा यांनी सांगितले. त्यांच्या सोबत श्रीराम कॅपिटलचे अध्यक्ष अरुण दुग्गल आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक उमेश रेवणकर हेही उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2013 12:28 pm