27 January 2021

News Flash

मुंबई बँकेवरील निर्बंध शिथिल

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबई बँकेवर गेल्या १५ वर्षांपासून असलेले गुंतवणूकविषयक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. कलम ३५-ए, पोटकलम (२)

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबई बँकेवर गेल्या १५ वर्षांपासून असलेले गुंतवणूकविषयक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. कलम ३५-ए, पोटकलम (२) अंतर्गत हे निर्बंध बँकेवर ३१ जुलै २००३ पासून लागू होते. ते आता उठवत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने १४ जून २०१८ रोजी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

निर्बंध हटविले गेल्याने मुंबई बँकेला म्युच्युअल फंड आणि सरकारी रोख्यांमध्ये अधिक ताकदीने गुंतवणूक करण्याचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होतील. बँकेचा महसूल वाढेल परिणामी बँकेच्या नफ्यामध्ये सकारात्मक वाढ होईल. तसेच बँकेला इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी आता रिझव्‍‌र्ह बँकेची मान्यता सहजपणे मिळू शकते, असा विश्वास मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. बँकेला आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन सुविधांचे दालन यातून खुले करता येणार आहे, ही बाब बँकेच्या व्यवसायात वाढीसाठी पूरक ठरेल. सद्य:स्थितीत बँकेच्या ठेवी ५०७८ कोटींवर असून खेळते भांडवल सुमारे ६६०० कोटींवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 2:29 am

Web Title: rbi remove restrictions on mumbai bank
Next Stories
1 अ‍ॅमेझॉनच्या नवागत आरोग्य कंपनीचे नेतृत्व अतुल गवांदे यांच्याकडे
2 ‘एआयआयबी’चा देशात १.९ अब्ज डॉलरच्या प्रकल्प गुंतवणुकीचा मानस
3 इंधनावर ‘जीएसटी’सह दुहेरी कराचा भार
Just Now!
X