महानगरांत इच्छित ठिकाणी मोकळीढाकळी वावरण्याची जागा, प्रकाशमान खोल्या असलेले घर मिळविणे मध्यमवर्गीय पगारदारांसाठी अशक्यच आहे. पण उपलब्ध इंचन्इंच जागेचा सुयोग्य आणि जबाबदारीने वापर करून अर्थात स्मार्ट साइज्ड घरांची संकल्पना राबवून हे शक्य आहे. राज्यात मोक्याच्या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीतील गृहयोजना साकारणाऱ्या झारा हॅबिटॅटने या संकल्पनेचा आजवर अनेक ठिकाणी वापर केला आहे. याच बांधकाम संकल्पनेतून झाराचे दादर पश्चिम येथे होरायझन नावाचा नवीन प्रकल्प उभा राहत आहे. कंपनीचे प्रमुख राज गाला शाह यांच्या मते, जागांच्या किमती नजीकच्या काळात उतरणे अशक्यच आहे. किंबहुना जागांच्या किमती व अधिमूल्य हे गृह प्रकल्प शहरातील कोणत्या ठिकाणी उभा आहे यावरून ठरतील. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांना त्यांच्या आवाक्यात बसणारे घर मिळवून देण्यासाठी ते वापरत असलेली बांधकाम संकल्पना उपयुक्त ठरेल, असा त्यांचा दावा आहे.