घराच्या छपरावर छोटेखानी सौरउर्जा प्रकल्प राबवत घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात घट होणे शक्य आहे; मात्र सरकारची इच्छाशक्ती असल्यास गावोगावी एटीएम मशीनपासून ते दूरसंचार मनोऱ्यांपर्यंत ही यंत्रणा उत्तमरित्या राबवली जाऊ  शकते.. सांगताहेत, टाटा पॉवर रिन्युएबल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राहुल शाह

शहरी भागांतील रहिवासी अथवा व्यावसायिक इमारतींच्या छतावर सौरउर्जा निर्मिती सुरू करण्याच्या नव्याने उदय होत असलेल्या बाजारपेठेबाबत टाटा पॉवरची काय योजना आहे?

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर

टाटा पॉवरची उपकंपनी टाटा पॉवर सोलार सिस्टीम्स ही भारतातल्या अग्रगण्य सौरऊर्जा इपीसी कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी ग्रीडशी जोडल्या जाणाऱ्या मोठय़ा सौरउर्जा प्रकल्पांच्या बांधणीव्यतिरिक्त रहिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींच्या छपरांवरील छोटय़ा सौरऊर्जा प्रकल्पांच्या बांधणीतही सक्रीय आहे. मुंबईसह महाराष्ट्रात आज छतावरील सौरऊर्जा ही संकल्पना रुजते आहे. नेट मीटर धोरणांतर्गत कोणत्याही ग्राहकाने ही सौरऊर्जा यंत्रणा बसवली तर त्याचे सध्याचे मीटर काढून त्याला नेट मीटर बसवून देण्यात येते. नेट मीटर हे किती ऊर्जा निर्माण केली व किती खर्च केली याची बेरीज करते.

छतावरील सौरऊर्जेद्वारे निर्माण केलेली ऊर्जा ग्राहकाच्या नावाने थेट ग्रीड निर्यात केली जाते. यामुळे टाटा पॉवरकडून ग्राहकाला येणाऱ्या देयकात त्याने ग्रीडकडे पाठवलेल्या उर्जेची किंमत वगळण्यात येते. सध्या टाटा पॉवर मुंबई व नवी दिल्लीत अनेक ठिकाणी छतावरील सौरऊर्जा प्रणाली बसवून देत आहे. या दोन शहरांपलीकडेही अनेक बाजारपेठांवर कंपनी आपले लक्ष केंद्रित करत आहे.

या बाजारपेठेचे अनेक फायदे आहेत. मात्र त्यासाठी विविध यंत्रणांमध्ये (ग्राहक, वीजवितरण कंपनी आणि सर्व प्रणाली एकत्र आणणारी यंत्रणा) सुसूत्रता असणे आवश्यक आहे. छतावरील सौरऊर्जा  प्रणालीबाबत ग्राहकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. अशा प्रणालीमुळे मिळू शकणाऱ्या आर्थिक फायद्याची जाणीव ग्राहकांना करून देण्याची आवश्यकता आहे. ऊर्जाबचतीसाठी कंपन्या वापरत असलेल्या एस्को मॉडेलच्या धर्तीवर एखादे प्रारूप विकसित करण्याची गरज आहे. याअंतर्गत छतावरील सौरऊर्जासाठी ग्राहक करत असलेली गुंतवणूक कशी सुरक्षित ठेवता येईल, याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा.

छतावरील सौरऊर्जेची संकल्पना आता भारतीय बाजारपेठेत रूजू लागली आहे. येत्या काही वर्षांत या क्षेत्राचा विस्तार कसा होईल?

सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांबाबत दाखवलेल्या उत्सुकतेमुळे येत्या काही वर्षांत भारतात या क्षेत्राला प्रचंड मागणी असेल हे सांगायला नकोच. केंद्र सरकारने छतावरील सौरऊर्जेसारख्या संकल्पनांनाही धोरणांद्वारे कमालीची उत्तेजना दिली आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यास ही संकल्पना अधिक वेगाने कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे यासाठी विविध कार्यान्वयन यंत्रणांमध्ये एकसूत्रीपणा आणणे गरजेचे आहे. स्वतंत्र छतावरील सौरऊर्जा केंद्र अथवा हायब्रिड व्यवस्थेद्वारे ग्रामीण भारतात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणे शक्य आहे. एटीएम मशीनपासून ते दूरसंचार मनोऱ्यांसह अनेक छोटय़ा यंत्रणांना छतावरील सौरऊर्जा वीज पुरवण्यात येऊ शकते. डिझेल जनरेटरपेक्षा ही सुविधा कितीतरी पटीने किफायतशीर आहे. नेट मीटरिंगसारख्या योजनांच्या अधिकाधिक प्रसाराद्वारे छतावरील सौरऊर्जा प्रणाली लोकप्रिय करता येणे सहज शक्य आहे. मात्र यासाठी स्थानिक वीज वितरण कंपन्यांचे पाठबळ अत्यंत निकडीचे आहे. तसेच छोटय़ा ग्राहकांसोबत करण्यात येणारे वीजखरेदी करार, त्याची व्यवहार्यता आदी बाबी पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या अक्षय/अपारंपरिक ऊर्जा विभागाची सध्याची क्षमता किती आहे? कोणते नवे प्रकल्प हाती घेतले आहेत व ते कधीपर्यंत पूर्ण होतील?

टाटा पॉवरच्या अक्षय/अपारंपरिक ऊर्जा विभागाची परिचलन क्षमता सध्या १,७७९ मेगावॉट इतकी आहे. यात ८४७ मेगावॉटचे पवनऊर्जा प्रकल्प आणि ९३२ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प आहेत. याखेरीज ४१२ मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जाप्रकल्पांच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. हे प्रकल्प लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे.

२०१६-१७ मध्ये कंपनीच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाने १५२ मेगा वॅट वीजनिर्मिती केली आणि १४७ मेगा वॅट वीज विक्री करण्यात आली. नव्या वित्त वर्षांतील कंपनीच्या प्रगतीचा अंदाज कसा असेल?

कंपनीतर्फे साधारण १,१४१ मेगा वॅट क्षमता असलेल्या वेल्सपन अपारंपरिक ऊर्जा कंपनीची १०० टक्के संपादन प्रRिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कंपनीची सौर, पवनऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टाटा पॉवर रिन्युएबल कंपनीची जलविद्युत, सौरऊर्जा, पवनऊर्जा, वाया जाणारा गॅस आदी विविध अपारंपरिक स्त्रोतांपासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता सध्या अंदाजे ३,१३३ मेगा वॅट आहे. यात आता वेल्सपन कंपनीच्या निर्मितीचीही भर पडली आहे.

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी कंपनी कोणत्या पर्यायांचा विचार करत आहे?

२०२५ पर्यंत एकूण उर्जानिर्मिती क्षमतेपैकी ३५ ते ४० टक्के वीजनिर्मिती ही अक्षय अथवा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमार्फत करण्याचा टाटा पॉवर कंपनीचा निर्धार आहे. अधिकाधिक वीजनिर्मिती नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ््हास न करता निर्माण करण्यासाठी टाटा पॉवर कटिबद्ध आहे. विशेष करून अक्षय ऊर्जेचे नवनवीन स्त्रोत शोधण्यासाठी व कंपनीची अक्षय ऊर्जानिर्मिती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांवर आमचा भर आहे.

छतावरील सौरऊर्जा प्रणालीच्या विकासामुळे पारंपरिक वीजप्रणालींच्या विकासदरात येत्या काही वषार्ंत घट होऊ शकते का? असल्यास किती?

टाटा पॉवरने सर्वंकष प्रगतीचा आराखडा तयार केला आहे. २०२२ सालापर्यंत १७५ गिगा वॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे सरकारचे ध्येय आहे. सरकारच्या ध्येयधोरणानुसारच टाटा पॉवरही सौरऊर्जा उभारणीवर लक्ष केंद्रित करत आहे. याला अनुसरून टाटा पॉवरने २०२५ पर्यंत एकूण क्षमतेच्या ३५ ते ४० टक्के वीजनिर्मिती अजीवाश्म इंधनातून करण्याचा मानस नुकताच जाहीर केला आहे. एकीकडे सर्वमान्य असलेली ग्रीड यंत्रणा सुरूच असताना छतावरील सौरऊर्जा प्रणालीच्या कार्यान्वनात काहीसा वेळ लागू शकतो. त्यामुळे अन्य विविध तंत्रज्ञानांच्या सह्यनेच १०० गिगा वॅटचे सरकारचे लक्ष्य गाठणे क्रमप्राप्त आहे.

कंपनीच्या कर्जाची सद्य्स्थिती काय आहे? अपारंपरिक ऊर्जा विभागातील काही मालमत्ता विकण्याचा अथवा नुकत्याच संपादित केलेल्या वेल्सपन रिन्युएबलमधील काही भाग विकून कर्ज कमी करण्याचा विचार आहे?

कमीत कमी आर्थिक धोका पत्करत नवी गुंतवणूक करणे आणि तसे करून कंपनीचा ताळेबंद निरोगी राखणे, ही सध्या आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. या योजनेमुळेच कंपनी आपले आर्थिक आरोग्य राखण्यात यशस्वी होत आहे.