29 May 2020

News Flash

₹ २००० च्या नोटांची छपाई बंद; ₹ २०० ची नोट पुढील महिन्यात चलनात

२०० रुपयांच्या नोटांची छपाई जोरात

रिझर्व्ह बँकेने पाच महिन्यांपूर्वीच २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. (संग्रहित)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेकडून बंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या नोटांची छपाई केली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच २०० रुपयांची नवी नोट लवकरच चलनात आणण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ती चलनात येईल, असे सांगितले जाते. या नोटांची छपाई वेगाने सुरू आहे.

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पाच महिन्यांपूर्वीच या नोटांची छपाई बंद केली आहे, अशी माहिती सूत्रांकड़ून देण्यात आली आहे. तर २०० रुपयांची नवी नोट पुढील महिन्यात चलनात आणली जाणार आहे. नोटांची छपाई वेगाने सुरू आहे, अशी माहितीही आरबीआयच्या सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर आरबीआयने ७.४ लाख कोटी रुपये मूल्याच्या ३.७ अब्ज २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर १००० रुपयांच्या ६.३ अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या, अशी माहिती आरबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. चलनपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आरबीआयने जूनमध्येच २०० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

२०० रुपयांच्या नवीन नोटा पुढील महिन्यात चलनात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नोटा बाजारात आल्यास चलन मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यास मदतगार ठरणार आहे, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडून कमी मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याने रिझर्व्ह बँकेकडून बँकांना कमी प्रमाणात नोटांचा पुरवठा होत आहे. आता २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर देवाण-घेवाणीच्या व्यवहारांमध्ये सुसूत्रता येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 1:56 pm

Web Title: reserve bank of india rbi stopped printing the rs 2000 currency notes demonetization
Next Stories
1 ‘निफ्टी’चा दश-सहस्त्रोत्सव!
2 घोटाळ्यांमुळे बँकांचे १६.७८ लाखांचे नुकसान
3 निफ्टीचा ‘मंगल’वार!; निर्देशांक १०००० पार
Just Now!
X