मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच २२ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सोमवारी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या आठवड्यापासून वाढ होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच निर्देशांकाने २२ हजारांची पातळी ओलाडून नवा टप्पा पार केला.
बॅंकींग, तेल व वायू उत्पादन आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना गुंतवणूकदारांची मोठी मागणी असल्याचे चित्र बाजारात आहे. सकाळी दहा वाजून १५ मिनिटांनी निर्देशांक २२ हजारांची पातळी ओलांडून २२,००५.५४ गेला. बीएचईएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एल ऍंड टी, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि स्टेट बॅंकेच्या शेअर्सना गुंतवणूकदारांची मागणी होती. त्यामुळे या शेअर्सचे भाव वधारले.