बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपला धक्का दिला असला तरी या निकालाचा शेअर बाजारावर मात्र नकारात्मक परिणाम सोमवारी पाहायला मिळत आहे.

शेअर बाजाराची सुरूवातच मोठा पडझडीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीचे व्यवहार तब्बल ६०० अंकांच्या घसरणीने खुले झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरूवात निराशेने झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुरूवातीलाच ५६२ अंकांची घसरण झाली, तर निफ्टीने ७,६०० अंकांची आपटी खाल्ली. त्यानंतर दुपारच्या सत्रात देखील शेअर बाजाराचे व्यवहार घसरणीनेच सुरू आहेत. प्रत्येक घसरणीच्या प्रसंगी मजबूत आर्थिक पाया असलेल्या समभागांच्या खरेदीची शिफारस विश्लेषकांनी केली आहे.